देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणाच्या तीव्र शब्दात विरोध केला. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांना धक्काबुक्की करणे ही उत्तर प्रदेश सरकारची मुजोरीची आहे. कृषी विधयके देशातील शेतकऱ्यांना मातीत घालणारी असल्याने शेतकऱ्यांना या ...
शुक्रवारी दुपारी १२ वाजता फुलचूर चौकातून काँग्रेसच्या बैलबंडी मोर्चाला सुरूवात झाली. या मोर्चात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जिल्हा काँग्रेस कमिटीने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीच्या पार्श्वभू ...
नाशिक : केंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी, कामगार व व्यापारीविरोधातील निर्णयांविरुद्ध किसान बचाव आंदोलनाचा शुभारंभ राज्याचे महसूलमंत्री व प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत लासलगावी करण्यात आला. यावेळी थोरात यांनी मोदी सरकारवर ...
Congress Sachin Sawant On Hathras Gangrape : सत्तेने बेधुंद झालेल्या व अहंकारीवृत्तीच्या आदित्यनाथ सरकारचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस जाहीर निषेध करत असल्याचं सावंत यांनी म्हटलं आहे. ...
केंद्र सरकारने शेतकरी व कामगार विरोधी विधेयक मागे घ्यावे, या मागणीसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवार दि. २ रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलन करण्यात आले़. ...
उदगीर : केंद्र सरकारने शेतकरीविरोधी मंजूर करुन घेतलेले कायदे रद्द करावेत तसेच काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांना करण्यात आलेल्या धक्काबुक्कीचा काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी धरणे आंदोलन करून ... ...