Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम

IPL मधील 'नंबर वन' सलामीवीर

By सुशांत जाधव | Updated: May 6, 2026 23:07 IST2026-05-06T23:04:16+5:302026-05-06T23:07:25+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 SRH vs PBKS Abhishek Sharma Creates History Breaks Chris Gayle Record Becomes Number One Player In This Lsit | Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम

Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम

Abhishek Sharma Record : सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्मानं बुधवारी आयपीएल स्पर्धेतील पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात आणखी एका स्फोटक खेळीसह मैफील लुटली. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संघाच्या डावाची सुरुवात करताना त्याने फक्त १३ चेंडूत ३५ धावा केल्या. या खेळीत त्याने २ चौकार आणि ३ षटकार ठोकले. त्याचे अर्धशतक हुकले, पण २६९.२३ च्या स्ट्राइक रेटच्या जोरावर त्याने ख्रिस गेलला मागे टाकत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा रेकॉर्ड

सनरायझर्स हैदराबादच्या डावातील चौथ्या षटकात लॉकी फर्ग्युसन याच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारताना तो झेल बाद झाला. पण त्याआधी २५ वर्षीय सलामीवीराने ख्रिस गेलचा विक्रम मोडला. अभिषेक शर्मा हा IPL मध्ये सलामीवीराच्या रुपात सर्वाधिक वेळा २०० पेक्षा अधिक स्ट्राइक रेटसह ३० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. १४ वेळा त्याने ही कामगिरी करुन दाखवली आहे. याआधी हा विक्रम ख्रिस गेलच्या नावे होता. २०२१ च्या हंगामात अखेरचा IPL सामना खेळणाऱ्या गेलनं १३ वेळा अशी कामगिरी केली होती.

IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी

या यादीत सुनील नरेनसह ट्रॅवेस हेडचंही नाव

IPL मधील सर्वोच्च स्ट्राइक रेटसह धावा काढणाऱ्या सलामीवीरांच्या यादीत अभिषेक शर्मा आणि ख्रिस गेलच्या पाठोपाठ तिसऱ्या स्थानावर सुनील नरेनचा नंबर लागतो. त्याने आतापर्यंतच्या आपल्या कारकिर्दीत १२ वेळा अशी कामगिरी करुन दाखवली आहे. डेविड वॉर्नर आणि ट्रॅविस हेड यांनी अनुक्रेम ११ आणि ९ वेळा हा डाव साधला आहे. 

यंदाच्या हंगामात सर्वोत्तम कामगिरी

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात अभिषेक शर्मा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. ११ सामन्यात त्याने २०१० च्या स्ट्राइक रेटसह ४७५ धावा केल्या आहेत. यात एका शतकासह ३ अर्धशतकांचा समावेश आहे. ऑरेंजर कॅपच्या शर्यतीत  हेन्री क्लासेन पाठोपाठ तो दुसऱ्या स्थानावर आहे. क्लासेन याने ११ सामन्यात ४९४ धावा केल्या आहेत.

Web Title : अभिषेक शर्मा ने तूफानी पारी से क्रिस गेल का रिकॉर्ड तोड़ा।

Web Summary : अभिषेक शर्मा ने पंजाब किंग्स के खिलाफ 13 गेंदों में 35 रनों की तूफानी पारी खेलकर क्रिस गेल का आईपीएल रिकॉर्ड तोड़ दिया। सनराइजर्स हैदराबाद के सलामी बल्लेबाज अब सलामी बल्लेबाज के रूप में 200+ स्ट्राइक रेट से सबसे ज्यादा 30+ स्कोर बनाने वाले खिलाड़ी हैं, उन्होंने यह उपलब्धि 14 बार हासिल की है।

Web Title : Abhishek Sharma breaks Chris Gayle's record with explosive innings.

Web Summary : Abhishek Sharma's blistering 35 off 13 balls against Punjab Kings shattered Chris Gayle's IPL record. The Sunrisers Hyderabad opener now holds the record for most 30+ scores at a 200+ strike rate as an opener, achieving this feat 14 times.