SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव

सनरायझर्स हैदराबादच्या संघाने फलंदाजीनंतर गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये सर्वोत्तम कामगिरी करून दाखवत 'नंबर वन'चा डाव साधला

By सुशांत जाधव | Updated: May 6, 2026 23:41 IST2026-05-06T23:38:50+5:302026-05-06T23:41:13+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 SRH vs PBKS Sunrisers Hyderabad beat Punjab Kings by 33 runs to climb top of points table | SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव

SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव

Sunrisers Hyderabad vs Punjab Kings, 49th Match Result : सनरायझर्स हैदराबादने घरच्या मैदानात पंजाब किंग्सचा ३३ धावांनी पराभव करत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र पंजाबच्या खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा घेत सनरायझर्स हैदराबादने निर्धारित २० षटकांत ४ विकेट्स गमावत २३५ धावा केल्या. या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना कूपर कॉलॉनी याने नाबाद शतकी खेळी केली, पण त्याची ही खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. अखेरीस पंजाब किंग्सला पराभव पत्करावा लागला.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

'त्या' तीन चुका पंजाब किंग्सला चांगल्याच महागात पडल्या  

नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना अभिषेक शर्मा आणि ट्रॅविस हेड जोडीनं संघाला धमाकेदार सुरुवात करुन दिली. अभिषेक शर्मा १३ चेंडूत ३५ धावा आणि ट्रॅवेस हेड १९ चेंडूत ३८ धावा करून परतल्यावर  लॉकी फर्ग्युसन आणि युझवेंद्र चहलनं यांनी  ईशान किशन आणि क्लासेन यांना स्वस्तात माघारी धाडण्यासाठी जाळे विणले. पण क्षेत्ररक्षकांनी गोलंदाजांना साथ दिली नाही. दोघांचे तीन झेल सुटले. याचा फायदा उठवत त्यांनी अर्धशतके झळकावली. या तीन चुकांची किंमत पंजाब किंग्सला पराभवासह मोजावी लागली. 

IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी

ईशानसह क्लासेनची शानदार अर्धशतक

ईशान किशन याने ३२ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ५५ धावा केल्या. हेन्री क्लासेन याने ४३ चेंडूत ३ चौकार आणि ३४ षटकारांच्या मदतीने ६९ धावांची दमदार खेळी केली. अखेरच्या षटकात नितिश कुमार रेड्डीनं १३ चेंडूत नाबाद २९ धावांची खेळी करत सनरायझर्स हैदराबादच्या धावफलकावर ४ बाद २३५ धावा लावल्या. पंजाबकडून गोलंदाजीत अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, लॉकी फर्ग्युसन आणि विजयकुमार वैशाक यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.

कूपर कॉनॉलीचं नाबाद शतक ठरलं व्यर्थ

सनरायझर्स हैदराबादच्या संघाने दिलेल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना पंजाब किंग्सची सुरुवात खराब झाली. प्रियांश आर्य १ (३) आणि प्रभसिमरन सिंग ३ (४) जोडी स्वस्तात माघारी फिरली. कर्णधार श्रेयस अय्यरही ५ धावा करून परतला. एका बाजूनं विकेट पडत असताना कूपर कॉनॉली शेवटपर्यंत मैदानात थांबला. त्याने ५९ चेंडूत ७ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने १०७ धावांची नाबाद खेळी साकारली. पण त्याची ही खेळी व्यर्थ ठरली. पंजाब किंग्सचा संघ ७ बाद २०२ धावांपर्यंतच मजल मारु शकला. सनरायझर्स हैदराबादकडून गोलंदाजीत कर्णधार पॅट कमिन्स आणि शिवांग कुमार यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. याशिवाय नितीश कुमार रेड्डी, एशान मलिंगा, साकीब हुसेन यांनी प्रत्येकी १-१ विकेट आपल्या खात्यात जमा केली.

Web Title : SRH ने PBKS को हराया: हैदराबाद की जीत, पंजाब की खराब फील्डिंग!

Web Summary : सनराइजर्स हैदराबाद ने पंजाब किंग्स को 33 रनों से हराया और अंक तालिका में शीर्ष स्थान हासिल किया। पंजाब की खराब क्षेत्ररक्षण के कारण हैदराबाद ने 235/4 का स्कोर बनाया। कूपर कॉलोनी के शतक के बावजूद, पंजाब हैदराबाद के प्रदर्शन के आगे हार गया।

Web Title : SRH Dominates PBKS: Hyderabad's Victory Due to Punjab's Fielding Lapses

Web Summary : Sunrisers Hyderabad defeated Punjab Kings by 33 runs, securing the top spot in the points table. Punjab's poor fielding helped Hyderabad reach a formidable 235/4. Despite a century by Cooper Colony, Punjab fell short, succumbing to Hyderabad's dominant performance.