इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 23:34 IST2026-05-06T23:33:46+5:302026-05-06T23:34:50+5:30

America Israel Iran War: इस्रायलच्या दाव्याने परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली असून, इराणने करार केला नाही, तर भयंकर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.

america and iran very close to make mou but donald trump not told to israel | इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”

इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”

America Israel Iran War: अमेरिका आणि इराण युद्ध संपवण्यासाठी एका कराराच्या जवळ पोहोचल्याचे म्हटले जात आहे. अमेरिकी अधिकाऱ्यांचा हवाला देत अमेरिकी वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे की, अमेरिका आणि इराण एका पानी सामंजस्य कराराला अंतिम रूप देण्याच्या जवळ आहेत. रिपोर्टनुसार, पुढील ४८ तासांत अमेरिकेला इराणकडून काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. अद्याप कोणताही अंतिम करार झालेला नसला तरी, युद्ध सुरू झाल्यापासून दोन्ही देश सामंजस्य कराराच्या इतके जवळ येण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे म्हटले जात आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून व्यापारी जहाजांना सुरक्षित रस्ता दाखवण्यासाठी एका नव्या योजनेची घोषणा केली आहे. या मोहिमेला 'प्रोजेक्ट फ्रीडम' असे नाव देण्यात आले आहे. मात्र, या योजनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून, अमेरिका आणि इराणमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. यातच इराण आणि अमेरिकेतील करार अंतिम टप्प्यात असल्याचे म्हटले जात आहे. परंतु, असा कोणता करार होत आहे, हे आम्हाला माहिती नाही, असे इस्रायलचे म्हणणे आहे. एकूणच युद्धाबाबत संभ्रम असल्याची स्थिती आहे. 

कराराबाबत इस्रायलला अनभिज्ञ, पुढच्या युद्धाची तयारी सुरू

इस्रायली सूत्रांच्या मते त्यांना या संभाव्य कराराबद्दल काहीही माहिती नाही. ते अजूनही पुढच्या युद्धाची तयारी करत आहेत. या इस्रायली दाव्यामुळे संपूर्ण परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू म्हणाले की, ते या विषयावर ट्रम्प यांच्याशी चर्चा करतील. इराणच्या बाबतीत सर्वांत महत्त्वाचे उद्दिष्ट तिथून सर्व संवर्धित युरेनियम काढून टाकणे हे आहे, यावर अध्यक्ष ट्रम्प आणि माझे पूर्णपणे एकमत आहे. आपण इराणची आण्विक क्षमता नष्ट केलीच पाहिजे, असेही इस्रायलने म्हटले आहे.

दरम्यान, ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला आहे की, जर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडली नाही, तर त्यांच्यावर पूर्वी कधीही न झालेल्या प्रमाणात बॉम्बहल्ला केला जाईल. इराणने वाटाघाटीत ठरलेल्या अटी मान्य केल्या, तर पुढील 'महाभयंकर प्रकोप' होणार नाही. एकदा नाकेबंदी उठवली की, होर्मुझ सर्वांसाठी खुला होईल. पण, नकार दिला, तर बॉम्बहल्ले पुन्हा सुरू होतील. ते पूर्वीपेक्षा अधिक मोठ्या प्रमाणावर असतील.

 

Web Title : इज़राइल का कहना है: ट्रम्प ने ईरान समझौते के बारे में नहीं बताया; हम हमला करते रहेंगे।

Web Summary : संभावित अमेरिकी-ईरान समझौते के बावजूद, इज़राइल ने अनभिज्ञता का दावा किया और भविष्य के संघर्ष की तैयारी कर रहा है। नेतन्याहू ट्रम्प के साथ इस मामले पर चर्चा करेंगे, ईरानी यूरेनियम हटाने को प्राथमिकता देंगे। ट्रम्प ने ईरान को गंभीर परिणाम की चेतावनी दी अगर होर्मुज जलडमरूमध्य बंद रहता है।

Web Title : Israel says: Trump didn't tell about Iran deal; We'll keep attacking.

Web Summary : Despite potential US-Iran deal, Israel claims ignorance and prepares for future conflict. Netanyahu will discuss the matter with Trump, prioritizing Iranian uranium removal. Trump warns Iran of severe consequences if Strait of Hormuz remains closed.