शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 20:52 IST2026-05-06T20:50:25+5:302026-05-06T20:52:09+5:30

Pune Crime : पर्वती येथे स्वतःच्या नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी या आजोबाला न्यायालयाने शुक्रवारपर्यंत (दि. ८) पोलिस कोठडी सुनावली.

Pune Crime The woman next door spread rumors about me; Grandfather's claim in the Parvati case; What exactly happened in court? | शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?

शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?

पुणे : तुला कोणत्या कारणासाठी न्यायालयात हजर करण्यात आले आहे, याची माहिती आहे का? असे न्यायालयाने आरोपीला विचारले. त्यावर आरोपीने, “मी नातीसोबत बसलो असता, शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली,” असे निर्लज्जपणे न्यायालयात उत्तर दिले. पर्वती येथे स्वतःच्या नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी या आजोबाला न्यायालयाने शुक्रवारपर्यंत (दि. ८) पोलिस कोठडी सुनावली.

आरोपीने मुलीला स्वतःच्या खोलीत बोलावून तिला निर्वस्त्र करून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयास दिली. दरम्यान, आरोपीच्या छातीवर मुलीच्या नखांचे ओरखडे आणि ओठांवर चावल्याचे व्रण उमटल्याची माहिती मिळाली आहे.

आरोपीला बुधवारी (दि. ६) संध्याकाळी विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपीची बलात्काराच्या गुन्ह्याच्या संबंधाने वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे. त्याने अशा प्रकारचे कृत्य यापूर्वी इतर कोणासोबत केले आहे का, याची पडताळणी करण्यात येत आहे. तसेच, आरोपीने यापूर्वी मुलीशी असे कृत्य केले आहे का, याबाबतदेखील तपास सुरू आहे.

गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी मंजूर करण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी केला. तपास अधिकारी, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर यांनी गुन्ह्याच्या तपासाची माहिती न्यायालयास दिली.

आरोपीच्या वतीने विधी सेवा प्राधिकरणाकडून वकील देण्यात आला आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

Web Title : पोती पर यौन उत्पीड़न का आरोप; दादाजी का चौंकाने वाला बचाव।

Web Summary : पुणे में एक दादाजी पर अपनी पोती पर यौन उत्पीड़न करने का आरोप है। उन्होंने दावा किया कि एक पड़ोसी ने अफवाह फैलाई। अदालत ने उसे शुक्रवार तक पुलिस हिरासत में भेज दिया है, जबकि कथित अपराध की जांच जारी है।

Web Title : Grandfather accused of assaulting granddaughter; court hears shocking defense.

Web Summary : A grandfather in Pune is accused of attempting to assault his granddaughter. He claimed a neighbor spread rumors. The court remanded him in police custody until Friday while investigations continue into the alleged crime.