“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 18:27 IST2026-05-06T18:27:40+5:302026-05-06T18:27:40+5:30

Thalapathy Vijay Meets Tamil Nadu Governor: अभिनेता विजय यांनी अद्याप बहुमताचे ११८ आमदारांचे पाठिंब्याचे पत्र सादर केले नसल्याचे म्हटले जात आहे.

bring a letter with the support of 118 mlas know what happened in the tamil nadu governor rajendra arlekar and tvk leader vijay meeting | “११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!

“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!

Thalapathy Vijay Meets Tamil Nadu Governor: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अभिनेता विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम अर्थात टीव्हीके पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. मात्र, कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने राज्यात 'त्रिशंकू' स्थिती निर्माण झाली आहे. हा 'त्रिशंकू' चक्रव्यूह भेदून विजय यांना सत्ता स्थापन करावी लागणार आहे. काँग्रेसने टीव्हीकेला पाठिंबा दर्शवला आहे. सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी अभिनेता विजय याने तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेतली. 

विजय यांच्या पक्षाने १०८ जागा जिंकल्या आहेत. तामिळनाडू विधानसभेच्या एकूण २३४ जागांपैकी सरकार स्थापनेसाठी ११८ जागांचे बहुमत आवश्यक आहे. सरकार स्थापनेसाठी विजय यांना अजून ११ आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. विजय यांनी आधी काँग्रेस नेतृत्वाशी संपर्क साधला आहे. टीव्हीकेने एआयएडीएमकेचा युतीचा प्रस्ताव सध्यापुरता स्थगित केला आहे.

कृपया ११८ सह्या (बहुमत) घेऊन परत या

सूत्रांनुसार, अभिनेता विजय यांनी अद्याप ११८ आमदारांचे पाठिंब्याचे पत्र सादर केलेले नाही. बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ आपल्याकडे असल्याचे त्यांनी तोंडी सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टीव्हीके यांनी १०७+५ म्हणजेच ११२ आमदारांच्या सह्या असलेले पत्र राज्यपालांना सादर केले होते. मात्र, राज्यपालांनी, कृपया ११८ सह्या (बहुमत) घेऊन परत या, असा प्रतिसाद दिला. यासाठी टीव्हीके यांनी काही वेळ मागितला आहे. दुसरीकडे, डीएमकेचा दीर्घकाळचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने आता त्याच्याशी संबंध तोडले असून, विजय यांच्या टीव्हीके पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे. पक्षाचे तामिळनाडू प्रभारी गिरीश चोडणकर म्हणाले की, जनतेच्या कौलचा आदर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, टीव्हीकेला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी द्रमुक आघाडीतील लहान पक्षांच्या पाठिंब्याची गरज पडू शकते. यामध्ये काँग्रेस (५ जागा), व्हीसीके (२), सीपीआय (२) आणि सीपीआयएम (२) या पक्षांचा समावेश आहे. या सर्वांनी पाठिंबा दिल्यास टीव्हीकेचा आकडा नेमका ११८ वर पोहोचू शकतो. जर एखादा पक्ष थेट सत्तेत सामील होण्यास तयार नसेल, तर टीव्हीके त्यांना मंत्रिमंडळात न घेता केवळ विश्वासदर्शक ठरावावेळी 'बाहेरून पाठिंबा' देण्याची विनंती करू शकते.

Web Title : विजय को और हस्ताक्षरों की आवश्यकता: राज्यपाल ने बहुमत समर्थन मांगा

Web Summary : अभिनेता विजय की पार्टी ने तमिलनाडु में सबसे ज्यादा सीटें जीतीं, लेकिन बहुमत नहीं है। उन्होंने राज्यपाल से मुलाकात की, समर्थन का दावा किया, लेकिन उन्हें 118 हस्ताक्षर सुरक्षित करने के लिए कहा गया। कांग्रेस ने समर्थन की पेशकश की, जिससे छोटी पार्टियों के साथ आवश्यक संख्या तक पहुंचने की संभावना है।

Web Title : Vijay Needs More Signatures: Governor Asks for Majority Support

Web Summary : Actor Vijay's party won most seats in Tamil Nadu, but lacks a majority. He met the Governor, claiming support, but was asked to secure 118 signatures. Congress offered support, potentially reaching the required number with smaller parties.