Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 17:12 IST2026-05-06T09:00:10+5:302026-05-06T17:12:33+5:30

महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...

Maharashtra Marathi News Live Updates 6 May 2026: West Bengal Chief Minister, Mamata Banerjee, PM Narendra Modi, Amit Shah, Thalapathi Vijay, Pune Crime, Nasrapur Case, CM Devendra Fadnavis, Punjab Blast, IPL 2026 | Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश

Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश

महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...

LIVE

Get Latest Updates

06 May, 26 : 05:12 PM

बंगाल हिंसाचारात २०० हून अधिक एफआयआर दाखल; ४३३ जणांना अटक

पश्चिम बंगालमधील निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराच्या घटनांवर बोलताना, पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक सिद्ध नाथ गुप्ता म्हणाले की, "आम्ही २०० हून अधिक एफआयआर दाखल केले आहेत. ४३३ जणांना अटक करण्यात आली आहे. प्रतिबंधात्मक कलमांखाली १,१०० हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. आज सकाळपासून कोणतीही हिंसक घटना घडलेली नाही."

06 May, 26 : 04:25 PM

मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी

बांगलादेशी फेरीवाल्यांची ओळख आणि पार्श्वभूमी पडताळणी कशी केली जाते? असा सवाल मुंबई हायकोर्टाने पालिकेला विचारला. यावर सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. वारंवार आदेश देऊनही बेकायदा फेरीवाल्यांची समस्या कायम असल्याची नोंद

06 May, 26 : 04:21 PM

चेंबूरमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यात बालकाचा मृतदेह

चेंबूरमधील नवजीवन सोसायटीच्या बाहेर असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला नवजात बालकाचा मृतदेह, घटनास्थळी चेंबूर पोलीस आणि फॉरेन्सिक टीम दाखल

06 May, 26 : 03:26 PM

पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान

पंजाबमधील जालंधर आणि अमृतसरमध्ये झालेल्या दोन भीषण स्फोटांनी संपूर्ण देशात खळबळ उडाली असतानाच, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी एक अत्यंत वादग्रस्त विधान केले आहे. "हिंदुस्तानात स्फोट होतच असतात, यात कोणती मोठी आणि नवीन गोष्ट आहे?" असे म्हणत त्यांनी या संवेदनशील घटनेला हलक्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या विधानामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

06 May, 26 : 01:28 PM

जालन्यात तरुणीवर अत्याचार; अश्लील फोटो काढून धर्मांतरासाठी दबाव

जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यात एका तरुणीचे अश्लील फोटो काढून धर्मांतरासाठी दबाव टाकल्या प्रकरणी शेख इम्रान शेख हबीब याच्यासह एकूण चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संबंधित तरुणीला बळजबरीने नमाज पठण करून तिच्यावर बुरखा घालण्यासाठी दबाव टाकल्याचा हा आरोप आहे. 

06 May, 26 : 12:44 PM

भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून तिथे हिंसाचाराचा घटना सातत्याने समोर येत आहे. हिंसाचाराच्या विविध घटनांमध्ये आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४०० हून अधिक ठिकाणी तृणमूल काँग्रेसच्या (TMC) कार्यालयांची तोडफोड करण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, ४ मे पासून आतापर्यंत अनेक ठिकाणी निवडणुकीशी संबंधित हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. या परिस्थितीनंतर राज्य सरकारने १० सदस्यीय 'फॅक्ट फाइंडिंग कमिटी'ची घोषणा केली आहे. वाचा सविस्तर 

06 May, 26 : 11:55 AM

"राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत"

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेत संताप व्यक्त केला आहे. "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न" असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच "सरकारने असा काही आकडा फिक्स केला आहे का की अजून एवढ्याएवढ्या मुलींवर अत्याचार झाल्यानंतर आम्ही शक्ती कायदा आणणार?" असा सवालही विचारला आहे. वाचा सविस्तर

06 May, 26 : 11:46 AM

पश्चिम बंगालमध्ये निकाल लागल्यानंतर सुरू झालेला हिंसाचार थांबेना, जमावाने लेलिनचा पुतळा तोडला, भाजपावर आरोप

पश्चिम बंगालमध्ये निकाल लागल्यानंतर सुरू झालेला हिंसाचाराचं सुरू झालेलं सत्र थांबण्याचं नाव घेत  नाही आहे. यादरम्यान, जमावाने लेलिनचा पुतळा तोडला असून,  हा पुतळा भाजपाच्या कार्यकर्त्यांनी तोडल्याचा आरोप करण्यात येत आहे. 

06 May, 26 : 11:35 AM

तामिळनाडूमध्ये सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग टीव्हीकेने आपल्या १०८ आमदारांना हॉटेलमध्ये हलवले

तामिळनाडूमध्ये सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग टीव्हीकेने आपल्या  १०८ आमदारांना हॉटेलमध्ये हलवले

06 May, 26 : 11:28 AM

TVK च्या सत्ता स्थापनेत AIDMK चे आमदार देणार पाठिंबा?

तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळात जोरदार हालचाली सुरू आहेत. राज्यात टीव्हीके पक्षाला बहुमतासाठी १० जागांची गरज आहे. त्यातच एआयडिएमके पक्षात फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यसभा खासदार सी. व्ही. षण्मुगम यांच्याशी निष्ठावंत असलेले आमदार टीव्हीकेसोबत जाण्याची चर्चा सुरू आहे.

06 May, 26 : 11:12 AM

'प्रोजेक्ट फ्रीडम' तात्पुरते बंद करण्याचे ट्रम्प यांचे आदेश

US इराण यांच्यातील संघर्षात होर्मुझ स्ट्रेटबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मध्य पूर्वेत व्यावसायिक जहाजांना सुरक्षा देण्यासाठी सुरू केलेल्या प्रोजेक्ट फ्रीडम या नौदल मोहिमेला स्थगिती देण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. परंतु इराणी बंदरावरील नाकेबंदी जारी राहील असंही अमेरिकेने स्पष्ट केले आहे. 

सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा

06 May, 26 : 11:01 AM

पश्चिम बंगाल तणाव! पोलीस आणि सुरक्षा जवानांवर गस्त घालत असतानाच गोळीबार

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये तणाव वाढला आहे. संदेशखालीमधील सर्बेरिया-अगरहाटी ग्राम पंचायत हद्दीतीलच बमनघेरीमध्ये गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. सुरक्षा जवानांसह गस्त घालत असलेल्या पोलिसांच्या पथकावर गोळीबार करण्यात आला. 

06 May, 26 : 10:38 AM

सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ

मध्य पूर्वेत बदलणाऱ्या परिस्थितीचा परिणाम भारताच्या कमोडिटी बाजारावरही पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर ६ मे २०२६ रोजी सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ नोंदवण्यात आली. आज सोन्याचा भाव १,५१,८०९ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा भाव २,५०,४९९ रुपये प्रति किलो वर पोहोचला आहे.

06 May, 26 : 10:16 AM

खलिस्तानी लिबरेशन आर्मीने घेतली स्फोटाची जबाबदारी

पंजाबच्या जालंधरमधील स्फोटाची जबाबदारी खलिस्तानी लिबरेशन आर्मीने घेतली. मंगळवारी रात्री पंजाब फ्रंटियर येथील BSF मुख्यालयाजवळ स्फोट झाला. त्यानंतर हा संपूर्ण परिसर सीलबंद करण्यात आला आहे. या घटनेबाबत अधिक माहिती गोळा करण्यासाठी आणि तपासात पंजाब पोलिसांना मदत करण्यासाठी 'राष्ट्रीय तपास यंत्रणे'चे (NIA) एक पथक सध्या जालंधरच्या दिशेने रवाना झाले आहे.

06 May, 26 : 09:31 AM

स्पर्धेतील नाव की, पुन्हा धक्का देणार; पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री कोण होणार?

भाजपाने पश्चिम बंगालमध्ये दणदणीत विजय मिळवला. पहिल्यांदाच भाजपाचा मुख्यमंत्री होणार असून, कोणाला संधी मिळणार याकडे सगळ्याचे लक्ष आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर विधिमंडळ नेता अर्थात मुख्यमंत्री निवडीची जबाबदारी सोपवण्यात आली असून, स्पर्धेत असलेल्या नेत्यांपैकी एका संधी देणार की, इतर राज्यामधील धक्का तंत्र पश्चिम बंगालमध्येही बघायला मिळणार याबद्दल उत्सुकता वाढली आहे. 

सुवेंदू अधिकारी, शमिक भट्टाचार्य, अग्निमित्रा पोल, रुपा गांगुली या नेत्यांची नावे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहे. पण, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, गुजरात या राज्यांप्रमाणेच भाजपा चर्चेत नसलेल्या नेत्याला या पदी बसवणार, याबद्दल चर्चा सुरू आहे. 

06 May, 26 : 09:22 AM

डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याआधीच इराणचे परराष्ट्रमंत्री पोहोचले चीनमध्ये 

होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी अममेरिकेने इराणच्या मालवाहू जहाजांना लक्ष्य केले. त्यामुळे पश्चिम आशियातील युद्ध संघर्ष वाढवण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अशातच इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची हे चीनमध्ये पोहोचले. 

एका शिष्टमंडळासोबत अरागची चीन दौऱ्यावर असून, ते चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प १४ आणि १५ मे रोजी चीने राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीसाठी चीन दौऱ्यावर जाणार आहेत. त्यापूर्वीच इराणचे मंत्री चीनमध्ये पोहोचले आहेत. 

06 May, 26 : 09:22 AM

'प्रोजेक्ट फ्रीडम' तात्पुरते बंद करण्याचे ट्रम्प यांचे आदेश

US इराण यांच्यातील संघर्षात होर्मुझ स्ट्रेटबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मध्य पूर्वेत व्यावसायिक जहाजांना सुरक्षा देण्यासाठी सुरू केलेल्या प्रोजेक्ट फ्रीडम या नौदल मोहिमेला स्थगिती देण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. परंतु इराणी बंदरावरील नाकेबंदी जारी राहील असंही अमेरिकेने स्पष्ट केले आहे. 

सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा

06 May, 26 : 09:21 AM

पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचे कार्यालय जाळले, दुसरे बुलडोझरने पाडले

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्याच्या विविध भागांतून हिंसाचाराच्या बातम्या येत आहेत. आसनसोल उत्तर मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयाला आग लावण्यात आल्याची घटना घडली आहे, तर दुसरीकडे कोलकात्याच्या न्यू मार्केट परिसरात बुलडोझरने टीएमसीचे युनियन कार्यालय जमीनदोस्त केल्याने तणाव वाढला आहे.

06 May, 26 : 09:14 AM

ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?

ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?

06 May, 26 : 09:13 AM

पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विजयानंतर मुख्यमंत्रीपदासाठी अग्निमित्रा पॉल यांच्या नावाची जोरदार चर्चा

अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 

06 May, 26 : 09:13 AM

पालघरमध्ये १३ वर्षीय मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, अघोरी पूजेसाठी बोलावून राक्षसी कृत्य

मोठ्या बहिणीचा मासिक पाळीनंतरही रक्तस्त्राव थांबत नसल्याने कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी एका भोंदूबाबाला संपर्क केला. त्याने अघोरी पूजा करावी लागेल आणि गावठी औषध देतो म्हणून भेटायला बोलावले. कुटुंबीय पीडित मुलीसह भोंदूबाबाला भेटायला गेले आणि त्याच वेळी त्याने पीडितेला बाजूला नेऊन एका स्मशानभूमीजवळ बलात्कार केला.

सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा

06 May, 26 : 09:12 AM

पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ

पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ

Web Title: Maharashtra Marathi News Live Updates 6 May 2026: West Bengal Chief Minister, Mamata Banerjee, PM Narendra Modi, Amit Shah, Thalapathi Vijay, Pune Crime, Nasrapur Case, CM Devendra Fadnavis, Punjab Blast, IPL 2026