Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम

६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम

Railway Project: देशाच्या पायाभूत सुविधा क्षेत्रात आणखी एक मोठं पाऊल उचलत केंद्र सरकारने रेल्वे नेटवर्क मजबूत करण्यासाठी हजारो कोटी रुपयांच्या मेगा योजनेला मंजुरी दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 09:50 IST2026-05-06T09:47:17+5:302026-05-06T09:50:12+5:30

Railway Project: देशाच्या पायाभूत सुविधा क्षेत्रात आणखी एक मोठं पाऊल उचलत केंद्र सरकारने रेल्वे नेटवर्क मजबूत करण्यासाठी हजारो कोटी रुपयांच्या मेगा योजनेला मंजुरी दिली आहे.

6 states 19 districts and 83 lakh people will directly benefit Railways will do this important work at a cost of rs 23400 crore pm modi cabinet decision | ६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम

६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम

Railway Project: देशाच्या पायाभूत सुविधा क्षेत्रात आणखी एक मोठं पाऊल उचलत केंद्र सरकारनेरेल्वे नेटवर्क मजबूत करण्यासाठी हजारो कोटी रुपयांच्या मेगा योजनेला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. येणाऱ्या काळात हा निर्णय प्रवाशांपासून ते उद्योगजगतापर्यंत सर्वांसाठी मोठे बदल घडवून आणणारा ठरू शकतो. हा केवळ नवीन मार्ग टाकण्याचा प्रकल्प नसून, देशाच्या आर्थिक विकासाचा वेग वाढवणारा इंजिन म्हणून याकडे पाहिलं जात आहे.

या निर्णयाद्वारे सरकारनं स्पष्ट संकेत दिलेत की, आता केवळ नवीन ट्रेन चालवण्यावरच नाही, तर संपूर्ण रेल्वे नेटवर्क अधिक कार्यक्षम आणि वेगवान बनवण्यावर भर दिला जात आहे. सध्याच्या मार्गांवरील वाढती गर्दी आणि मालवाहतुकीचा ताण लक्षात घेता हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

१ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत

कुठे आणि किती लांबीची नवीन लाईन टाकली जाणार?

सरकारनं सुमारे २३,४३७ कोटी रुपये खर्चाच्या ९०१ किलोमीटर लांबीच्या मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. याअंतर्गत नागदा-मथुरा, गुंतकल-वाडी आणि बुढवल-सीतापुर या तीन मोठ्या आणि धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या मार्गांवर नवीन रेल्वे लाईन टाकल्या जाणार आहेत. हे मार्ग आधीच व्यस्त असून तिथे वाहतुकीचा ताण सातत्यानं वाढत आहे. नवीन मार्गिकेमुळे या मार्गावरील गाड्यांची ये-जा अधिक सुलभ आणि वेगवान होईल. हा प्रकल्प एकूण १९ जिल्ह्यांमधून जाणार असून सुमारे ८३ लाख लोकांना याचा थेट फायदा होईल. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या सहा राज्यांना यामुळे उत्तम कनेक्टिव्हिटी मिळेल.

पर्यटन आणि धार्मिक स्थळांपर्यंत पोहोचणं होणार सोपं

नवीन रेल्वे मार्गांमुळे देशातील अनेक प्रमुख धार्मिक आणि पर्यटन स्थळांपर्यंत पोहोचणे पूर्वीपेक्षा सोपे होईल. मथुरा आणि वृंदावन यांसारख्या धार्मिक शहरांसह महाकालेश्वर आणि नैमिषारण्य यांसारख्या तीर्थक्षेत्रांचा प्रवासाचा वेळ कमी होईल. याशिवाय रणथंभौर, कुनो आणि केवलादेव नॅशनल पार्क सारख्या पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येतही वाढ होण्याची अपेक्षा आहे.

मालवाहतूक आणि व्यापाराला मिळणार चालना

हा प्रकल्प केवळ प्रवाशांसाठीच नाही, तर उद्योग आणि व्यवसायासाठीही 'गेम चेंजर' ठरू शकतो. असा अंदाज आहे की, यामुळे दरवर्षी सुमारे ६० दशलक्ष टन अतिरिक्त मालवाहतूक शक्य होईल. कोळसा, सिमेंट, पोलाद, खत आणि धान्य यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा वेगवान होईल. यामुळे लॉजिस्टिक खर्च कमी होईल आणि वस्तूंच्या किमती नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल.

प्रवाशांसाठी काय बदलणार?

मल्टी-ट्रॅकिंगचा सर्वात मोठा फायदा प्रवाशांना मिळेल. सध्या अनेक मार्गांवर गाड्यांच्या गर्दीमुळे उशीर होणे ही सामान्य बाब आहे. नवीन मार्ग जोडले गेल्यामुळे एक्सप्रेस आणि पॅसेंजर गाड्यांचा वेग वाढेल आणि त्यांच्या वक्तशीरपणात सुधारणा होईल. यामुळे प्रवास अधिक आरामदायी आणि विश्वासार्ह बनेल.

पर्यावरणावरही सकारात्मक परिणाम

रस्ते वाहतुकीच्या तुलनेत रेल्वेद्वारे होणारी मालवाहतूक ही अधिक पर्यावरणपूरक मानली जाते. या प्रकल्पामुळे रस्त्यांवरील ट्रकचा ताण कमी होईल, ज्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. हे पाऊल देशाला शाश्वत आणि हरित विकासाच्या दिशेनं पुढे नेणारं ठरेल.

Web Title : ₹23,400 करोड़ का रेल विकास: 6 राज्यों को मल्टी-ट्रैकिंग से लाभ

Web Summary : सरकार ने छह राज्यों में ₹23,400 करोड़ की मल्टी-ट्रैकिंग परियोजना को मंजूरी दी। 901 किलोमीटर की यह परियोजना कनेक्टिविटी बढ़ाती है, माल परिवहन को बढ़ावा देती है, और धार्मिक व पर्यटन स्थलों की यात्री यात्रा को सुगम बनाती है, जिससे आर्थिक विकास और प्रदूषण में कमी आती है।

Web Title : ₹23,400 Cr Railway Boost: 6 States Benefit from Multi-Tracking

Web Summary : Government approves ₹23,400 crore multi-tracking project across six states. The 901 km project enhances connectivity, boosts freight transport, and eases passenger travel to religious and tourist sites, promoting economic growth and reducing pollution.