LIC म्युच्युअल फंडची किमया! फक्त १० वर्षात उभारा ₹३४ लाखांचा फंड, किती गुंतवणूक करावी लागेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 19:12 IST2026-05-04T19:05:26+5:302026-05-04T19:12:28+5:30

LIC Mutual Fund: तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर LIC च्या या टॉप-५ योजना उत्कृष्ट पर्याय ठरू शकतात.

LIC Mutual Fund: दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक गुंतवणुकीबाबत अधिक जागरूकता झाले आहेत. भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी लोक आता नियोजनबद्ध गुंतवणुकीकडे वळत आहेत. मात्र, योग्य माहितीशिवाय गुंतवणूक करणे धोकादायक ठरू शकते. अशा परिस्थितीत LIC Mutual Fund च्या काही योजनांनी दीर्घकालीन कालावधीत चांगला परतावा दिल्याने त्या गुंतवणूकदारांसाठी आकर्षक पर्याय ठरत आहेत.

LIC च्या प्रायोजकत्वाखाली २० एप्रिल १९९४ रोजी स्थापन झालेल्या या फंड हाऊसने इक्विटी आणि डेट अशा दोन्ही प्रकारांत विविध योजना सुरू केल्या आहेत. Association of Mutual Funds in India (AMFI) नुसार, याची ट्रस्टी कंपनी LIC Mutual Fund Trustee Private Ltd. असून, एसेट मॅनेजमेंट कंपनी LIC Mutual Fund Asset Management Limited आहे.

१) दीर्घकालीन गुंतवणुकीत उत्तम परतावा देणाऱ्या पाच प्रमुख योजनांचा आढावा घेतल्यास, पहिल्या क्रमांकावर LIC MF इन्फ्रास्ट्रक्चर फंड येतो. या योजनेने मागील दहा वर्षांत सरासरी १८.५१ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. या योजनेचा NAV सध्या ६०.०८ रुपये असून, दरमहा १०,००० रुपयांची SIP केल्यास दहा वर्षांत सुमारे ३४.७३ लाख रुपयांचा निधी तयार झाल्याचे दिसते.

२) दुसऱ्या क्रमांकावर LIC MF लार्ज अँड मिड कॅप फंड आहे. या योजनेने दहा वर्षांत १६.१८ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. सध्याचा NAV ४३.११ रुपये असून १०,००० रुपयांच्या मासिक SIPमधून सुमारे २९.९८ लाख रुपये तयार झाले असते.

३) तिसऱ्या क्रमांकावर LIC MF निफ्टी नेक्स्ट ५० इंडेक्स फंड येतो. या योजनेने मागील दहा वर्षांत १४.४१ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. या योजनेचा NAV ५७.६२ रुपये असून १०,००० रुपयांच्या SIPमधून दहा वर्षांत सुमारे २६.८७ लाख रुपये जमा झाले असते.

४) चौथ्या क्रमांकावर LIC MF निफ्टी १०० ETF ही योजना आहे. या योजनेने दहा वर्षांत १३.१० टक्के वार्षिक परतावा दिला असून सध्याचा NAV २७१.९८ रुपये आहे. १०,००० रुपयांच्या SIPमधून सुमारे २४.८१ लाख रुपये तयार झाले असते.

५) पाचव्या क्रमांकावर LIC MF निफ्टी ५० ETF योजना आहे. या योजनेने मागील दहा वर्षांत १३.०५ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. या योजनेचा NAV २६७.४६ रुपये असून १०,००० रुपयांच्या SIPमधून सुमारे २४.७४ लाख रुपयांचा निधी तयार झाला असता. (टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)