Nicholas Pooran Breaks Vaibhav Suryavanshi Record : वानखेडेच्या मैदानातील मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात अखेर लखनौ सुपर जाएंट्सचा महागडा फलंदाज निकोलस पूरनची बॅट तळपली. तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळाल्यावर षटकारांची अक्षरश: 'बरसात' करत त्याने अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक साजरे केले. त्याने २१ चेंडूत १ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने ६३ धावांची धमाकेदार खेळी केली. IPL कारकिर्दीत लखनौ सुपर जाएंट्सकडून हे दुसरे वेगवान अर्धशतक ठरले. LSG कडून सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम हा निक्कीच्या नावेच आहे. त्याने २०२३ च्या हंगामात त्याने RCB विरुद्धच्या सामन्यात १५ चेंडूत अर्धशतक साजरे केल्याचा रेकॉर्ड आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पूरनचा धमाका! वादळी अर्धशतकी खेळीसह मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात लखनौचा संघाकडून सलामीच्या रुपात नवा प्रयोग पाहायला मिळाला. जॉश इंग्लिसला LSG कडून पदार्पणाची संधी मिळाली. ८ कोटी ६० लाख रुपयांचा डाव खेळलेल्या या महागड्या खेळाडूनं मिचेल मार्शच्या साथीनं संघाच्या डावाची सुरुवात केली. पण तो सपशेल अपयशी ठरला. १३ धावा करून त्याने मैदानात सोडल्यावर निकोलस पूरनला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्यात आले. बढती मिळताच त्याने वादळी खेळीसह यंदाच्या हंगामातील पहिले अर्धशतक झळकावताना वैभव सूर्यवंशीचा विक्रम मोडीत काढला आहे.
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
अभिषेक शर्मा अव्वल, त्यापाठोपाठ आता निक्कीचा नंबर
या अर्धशतकासह निकोलस पूरन याने वैभव सूर्यवंशीचा खास विक्रम मोडीत काढला आहे. IPL मध्ये पाचव्यांदा पूरनने २० पेक्षा कमी चेंडूत अर्धशतक साजरे करण्याचा पराक्रम नोंदवला आहे. वैभव सूर्यवंशीनं आपल्या अल्प कारकिर्दीत ३ वेळा ही कामगिरी करून दाखवली आहे. या यादीत अभिषेक शर्मा ६ अर्धशतकासह अव्वलस्थानी आहे.
LSG कडून सर्वात वेगवान अर्धशतकाचा रेकॉर्ड
- १५ - निकोलस पूरन विरुद्ध RCB, बंगळुरू, २०२३
- १६ - निकोलस पूरन विरुद्ध MI, वानखेडे, २०२६
- १८ - निकोलस पूरन विरुद्ध SRH, हैदराबाद, २०२५
- १९ - निकोलस पूरन विरुद्ध MI, वानखेडे, २०२४
- २० - काइल मेयर्स विरुद्ध PBSK, मोहाली, २०२३
- २० - निकोलस पूरन विरुद्ध DC, दिल्ली, २०२४