MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...

मुंबई इंडियन्सवर का आली कॅप्टन बदलण्याची वेळ?

By सुशांत जाधव | Updated: May 4, 2026 19:30 IST2026-05-04T19:27:40+5:302026-05-04T19:30:35+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 MI vs LSG Rohit Sharma In Hardik Pandya Out Suryakumar Yadav Lead Mumbain Indians Opt To Bowl vs LSG | MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...

MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...

IPL 2026 MI vs LSG  : आयपीएल २०२६ स्पर्धेत संघर्षाचा सामना करणारा मुंबई इंडियन्सचा संघ वानखेडेच्या घरच्या मैदानातील लखनौ सुपर जाएंट्स विरुद्धच्या सामन्यात मोठ्या बदलासह मैदानात उतरला आहे. नियमित कर्णधार हार्दिक पांड्या प्लेइंग इलेव्हनमधून आउट झाला असून त्याच्या जागी सूर्यकुमार यादव नाणेफेकीसाठी मैदानात आल्याचे पाहायला मिळाले.  त्याने नाणेफेक जिंकल्यावर पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  दुखापतीतून सावरून रोहित शर्मा या सामन्यातून कमबॅक करत असल्याचे सांगताना हार्दिक पांड्या संघात का नाही? तेही सूर्यकुमार यादवनं नाणेफेकीच्या वेळी स्पष्ट केले. 

मुंबई इंडियन्सवर का आली कॅप्टन बदलण्याची वेळ?

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सूर्यकुमार यादव दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करण्यासाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. यंदाच्या हंगामातील MI च्या खराब कामगिरीमुळे हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत होत असताना हा बदल अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह उपस्थितीत करणारा आहे. पण नाणेफेकीनंतर सूर्यानं MI च्या ताफ्यातील नेतृत्वाबदलामागचं खरं कारण स्पष्ट केले.  हार्दिक पांड्याची तब्येत ठिक नाही, त्यामुळे तो या सामन्यासाठी उपलब्ध नाही, असे सूर्याने सांगितले.  


मुंबई इंडियन्स  प्लेइंग इलेव्हन :

रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक/फलंदाज.), नमन धीर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, विल जॅक्स, राज बावा, कॉर्बिन बॉश, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, एएम गझनफर, रघु शर्मा

  • मुंबई इंडियन्स इम्पॅक्ट प्लेयर : रोहित शर्मा, मयंक रावत, रॉबिन मिन्झ, शार्दुल ठाकूर, ट्रेंट बोल्ट
     

लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन

 मिचेल मार्श, एडन मार्कराम, रिषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), जोश इंग्लिस, निकोलस पूरन, अक्षत रघुवंशी, हिम्मत सिंग, मोहम्मद शमी, मोहसीन खान, आवेश खान, प्रिन्स यादव
 

  • लखनौ सुपर जायंट्स इम्पॅक्ट प्लेयर : मणिमरन सिद्धार्थ, दिग्वेश सिंग राठी, मयंक यादव, शाहबाज अहमद, अब्दुल समद 

Web Title : MI vs LSG: हार्दिक बाहर, सूर्या कप्तान; रोहित की वापसी, कारण खुलासा!

Web Summary : लखनऊ के खिलाफ मुंबई इंडियंस ने हार्दिक की बीमारी के कारण कप्तान बदला। सूर्या ने टॉस जीतकर गेंदबाजी चुनी। रोहित टीम में वापस आए।

Web Title : MI vs LSG: Hardik Out, Surya Captain; Rohit Returns, Reason Revealed!

Web Summary : Mumbai Indians changed captain against Lucknow due to Hardik's illness. Surya led the toss, opting to bowl. Rohit returned to the team.