दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 15:00 IST2026-05-04T14:58:54+5:302026-05-04T15:00:19+5:30
Nissan Gravite CNG Price: निसान इंडियाने ७-सीटर ग्रेवाइटसाठी ट्विन-सिलिंडर सीएनजी किट लाँच केले आहे. कमी किमतीत मोठी फॅमिली कार शोधणाऱ्यांसाठी हा सर्वोत्तम पर्याय.

दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
भारतीय बाजारपेठेत स्वस्त आणि मस्त ७-सीटर कार शोधणाऱ्या ग्राहकांसाठी निसानने एक जबरदस्त पर्याय उपलब्ध करून दिला आहे. निसान मोटर इंडियाने आपल्या 'निसान ग्रेवाइट' या एमपीव्हीसाठी ट्विन-सिलिंडर सीएनजी रेट्रोफिटमेंट किट लाँच केले आहे. या किटसह गाडीची सुरुवातीची किंमत केवळ ६.५३ लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे.
निसान ग्रेवाइटमध्ये पहिल्यांदाच २५-२५ लिटरचे दोन सिलिंडर बसवण्यात आले आहेत. या स्मार्ट डिझाईनमुळे गाडीच्या तिसऱ्या रांगेत बसणाऱ्या प्रवाशांना कोणतीही अडचण येत नाही आणि लेग-स्पेसही पुरेशी मिळते. या सरकारी प्रमाणित सीएनजी किटची किंमत ८२,९९९ रुपयांपासून सुरू होते.
सुरक्षा आणि वॉरंटीची खात्री
निसानने या किटसाठी ३ वर्षे किंवा १ लाख किलोमीटरपर्यंतची थर्ड पार्टी वॉरंटी जाहीर केली आहे. हे किट BS 6.2 मानकांनुसार असून मोटोजेनने विकसित केले आहे. सुरक्षेसाठी यात ८.१ एमएम जाडीचा हेवी ड्युटी सिलिंडर वापरण्यात आला आहे.
फॅक्टरी फिनिश: सीएनजी भरण्याचा पॉइंट पेट्रोल लिडच्या खालीच देण्यात आला आहे. पेट्रोल आणि सीएनजीमध्ये स्विच करणे अत्यंत सोपे आहे. देशातील १६ राज्यांमधील ६० शहरांमध्ये निसानच्या अधिकृत डीलरकडे हे किट उपलब्ध आहे. निसान ग्रेवाइट सीएनजी एकूण ९ व्हेरियंटमध्ये उपलब्ध असून टॉप मॉडेलची किंमत ८.९४ लाख रुपयांपर्यंत आहे.