Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 08:46 IST2026-05-04T07:32:03+5:302026-05-04T08:46:43+5:30
Election Results 2026 LIVE: देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. त्यात आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम ...

Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
Election Results 2026 LIVE: देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. त्यात आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पुदुचेरी या राज्यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये कुणाला कौल मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपामध्ये अतिशय अटीतटीची लढत पाहायला मिळाली. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर पाचही राज्यांमध्ये व केंद्रशासित प्रदेशात कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. याशिवाय महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीचा निकालही आज लागणार आहे. महाराष्ट्रातील बारामती येथे सुनेत्रा पवार तर राहुरीच्या जागेवर भाजपाकडून शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले निवडणूक रिंगणात आहेत.
LIVE
04 May, 26 : 09:05 AM
राहुरी पोटनिवडणुकीत भाजपाचे अक्षय कर्डिले आघाडीवर
महाराष्ट्रातील राहुरी पोटनिवडणुकीत भाजपाचे अक्षय कर्डिले ४२६६ मतांनी आघाडीवर आहेत. आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. तिथे भाजपाचे अक्षय कर्डिले आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गोविंद मोकाटे यांच्यात लढत होत आहे.
04 May, 26 : 09:00 AM
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत
पश्चिम बंगालमध्ये मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या तासाभरात आलेल्या कलांमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची लढत दिसून येत आहे. तसेच सध्याच्या आकडेवारीनुसार २०९ जागांचे कल समोर आले असून, त्यात भाजपाने १०३ तर तृणमूल काँग्रेसने १०३ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस २ आणि इतर पक्ष हे १ जागेवार आघाडीवर आहेत.
04 May, 26 : 08:29 AM
राहुरी विधानसभा मतदारसंघातील टपाली मतांच्या मतमोजणीत भाजपाचे अक्षय कर्डिले आघाडीवर
अहिल्यानगरमधील राहुरी विधानसभा मतदारसंघातील टपाली मतांच्या मतमोजणीत भाजपाचे अक्षय कर्डिले यांनी आघाडी घेतली आहे.
04 May, 26 : 08:26 AM
५ राज्यांच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू, सुरुवातीचे कल हाती
आसाममध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपा ७ जागांवर पुढे, पश्चिम बंगालमध्ये २ जागांवर टीएमसीने तर ३ जागांवर भाजपाने आघाडी घेतली. सकाळी ८ वाजल्यापासून ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. आसाममध्ये काँग्रेसदेखील ५ जागांवर आघाडीवर आहे. केरळमध्ये यूडीएफ २ जागांवर तर एलडीएफ १ जागेवर पुढे आहे.
04 May, 26 : 07:50 AM
कोलकाता येथे मतमोजणी केंद्राबाहेर कडेकोट सुरक्षा बंदोबस्त
पश्चिम बंगालमधील २९३ विधानसभा जागांसाठी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. निकालाच्या पार्श्वभूमीवर कोलकाता येथील नेताजी इनडोअर स्टेडियमबाहेरील 'स्ट्रॉंग रूम' परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
#WATCH | West Bengal Elections 2026 | Heavy security deployed outside the strong room at Netaji Indoor Stadium in Kolkata as the counting of votes for 293 Assembly constituencies of West Bengal will start at 8 am.
— ANI (@ANI) May 4, 2026
Returning Officers and party agents are in the queue outside the… pic.twitter.com/ZWT6hDRD7e
04 May, 26 : 07:44 AM
केरळमध्ये आमचा विजय होईल, प्रदेशाध्यक्ष जोसेफ यांनी व्यक्त केला विश्वास
केरळच्या निकालाबाबत आम्ही पूर्ण आशावादी आहोत. नक्कीच आमचा विजय होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे निकाल लागले त्याचीच पुनरावृत्ती यावेळीही होईल. जागांच्या संख्येबाबत आता अंदाज लावू शकत नाही मात्र आमच्या विजयाची खात्री आहे असा विश्वास केरळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सनी जोसेफ यांनी व्यक्त केला.
#WATCH | Keralam Elections 2026 | State Congress president Sunny Joseph says, "We are fully hopeful. We will win. This will be a repetition of the local body results. We are very confident that we will win. Number we cannot predict..." pic.twitter.com/RY0ju20DYt
— ANI (@ANI) May 4, 2026
04 May, 26 : 07:40 AM
सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी, आसाममध्ये प्रशासन सज्ज
आसाममधील जोरहाट मतमोजणी केंद्राबाहेरील दृश्य, सकाळी ८ वाजल्यापासून १२६ जागांसाठी होणार मतमोजणी, प्रशासनाने सर्व प्रक्रिया केली पूर्ण
#WATCH | Assam Assembly Elections 2026 | Assam: Visuals from outside a counting centre in Jorhat. Counting of votes for Jorhat, Mariani and Titabor Assembly constituencies will take place here.
— ANI (@ANI) May 4, 2026
Counting of votes for 126 Assembly constituencies will begin from 8 am. pic.twitter.com/opoVjsisAe