राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
By सोमनाथ खताळ | Updated: May 4, 2026 04:57 IST2026-05-04T04:56:42+5:302026-05-04T04:57:32+5:30
दररोज २७ मुली ठरतात वासनेचा बळी : १२० दिवसांत ३,२७९ गुन्हे दाखल, अत्याचार कधी थांबणार?

राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
सोमनाथ खताळ
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला. राज्यात दररोज चिमुकल्यांचे बालपण नराधमांकडून खुडले जात असल्याचे भीषण वास्तव पोलिस दलाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
मागील वर्षात राज्यात एकूण १० हजार १३१ पोक्सो गुन्हे दाखल झाले होते. चालू वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांतच (एप्रिलअखेर) ३ हजार २७९ गुन्हे नोंदविले गेले आहेत. या आकडेवारीनुसार राज्यात दररोज सरासरी २७ चिमुकल्या वासनेच्या बळी जात असून दर ५३ मिनिटाला एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा गुन्हा दाखल होत आहे. १ जानेवारी २०२५ ते एप्रिल २०२६ पर्यंत तब्बल १३ हजार ४१० गुन्हे दाखल झाले आहेत.
पुणे जिल्ह्याची स्थिती अत्यंत गंभीर आहे. पुण्याच्या ग्रामीण भागात एप्रिलअखेरपर्यंत १४० गुन्हे तर पुणे शहर हद्दीत या चार महिन्यात १८१ गुन्हे नोंदवले गेले. पिंपरी-चिंचवड येथेही ११८ गुन्हे दाखल आहेत.
अहिल्यानगर ६१५
अकोला २४४
अमरावती ४५९
बीड ३६८
भंडारा १२७
मुंबई १,८१०
बुलडाणा २४६
चंद्रपूर २५०
छ. संभाजीनगर ४२३
धाराशिव १५८
धुळे ११३
गडचिरोली ९७
गोंदिया १८१
हिंगोली ९६
जळगाव २९०
जालना १८२
कोल्हापूर ३१५
लातूर १८७
नागपूर ५५८
नांदेड २२१
नंदूरबार ९१
नाशिक ६१४
पालघर १३३
परभणी १५५
पुणे १७३६
रायगड २०७
रत्नागिरी १०४
सांगली २४३
सातारा २७६
सिंधुदुर्ग ५८
सोलापूर ५८४
ठाणे १५९३
वर्धा १५०
वाशिम १३१
यवतमाळ २९५
एकूण १३,४१०
...तोवर नेत्यांनी माझ्या घरी येऊ नये
माझ्या मुलीला खरा न्याय मिळेपर्यंत, आरोपीला
फाशी होईपर्यंत राजकीय नेत्यांनी माझ्या घरी भेट देऊ नये, अशी विनंती पीडितेच्या वडिलांनी केली आहे.
आयोगाकडून तीव्र निषेध
नसरापूर येथील घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करत या प्रकरणी तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रीय महिला आयोगाने केली.
नसरापूरप्रकरणी एसआयटी स्थापन
या प्रकरणाची सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले असून, आरोपीला फाशीची शिक्षा मिळवून देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे दिली.
६५ वर्षीय आरोपीला ७ मेपर्यंत पोलीस कोठडी
सुनावण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी सहा अधिकाऱ्यांच्या एसआयटीची स्थापना केली असून त्यात दोन महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
घटना गंभीर आहे, रोषही साहजिक आहे. मी मुलीच्या वडिलांचे आभार मानतो. त्यांनी ती परिस्थिती समजून घेतली. पीडितेच्या कुटुंबाच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री