09:29 PM मुंबई- अभिनेत्री मॉडेल राखी सावंतच्या आईचं निधन, मुंबईतील रुग्णालयात आज रात्री ८ वाजून ३२ मिनिटांनी घेतला अखेरचा श्वास.
08:00 PM सोलापूर - पुणे रोडवरील केगाव परिसरात पुलावरून उडी मारल्यानंतर एकाच वेळी १२ हरणांचा मृत्यू.
05:47 PM नाशिक: जेष्ठ साहित्यिका आशा बगे यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान सन्मान जाहीर
05:43 PM साखर कारखान्यांनी सीएनजी, हायड्रोजन निर्मितीकडे वळावे; शरद पवारांचा सल्ला
05:34 PM मुंबई - अदानी समुहातील गैरकारभाराची चौकशी स्वतंत्र एसआयटीमार्फत करावी - नाना पटोले
03:56 PM बुलढाणा - कोणाला पाठिंबा द्यायचा या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय होणार - रविकांत तुपकर
01:44 PM कोल्हापूर: दोनवडे विवाहित महिलेचा खून, गावात उडाली एकच खळबळ
12:01 PM नवी दिल्ली- मध्य प्रदेशातील मोरेनाजवळ सुखोई-30 आणि मिराज 2000 अशी दोन विमाने कोसळली आहेत. शोध आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.
10:21 AM जळगाव : लासूर - चोपडा मुक्कामी बस अकुलखेडाननजीक अचानक उलटली. यात २८ ते ३० विद्यार्थ्यांसह प्रवासी होते. या सर्वांना मुका मार लागला आहे.
09:58 AM सिरोंचा : रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला टाटा मॅजिक या प्रवासी वाहनाने जोरदार धडक दिल्याने एक जण ठार तर चौघे गंभीर जखमी झाले.
08:05 AM संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे पुणे येथे निधन झाले.
01:16 AM चाळीसगाव : अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्या जखमी, शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली घटना