भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 08:49 IST2026-05-04T08:48:59+5:302026-05-04T08:49:37+5:30

पश्चिम बंगालच्या राजकारणात ध्रुवीकरण हा देखील एक मोठा मुद्दा आहे. शहरी भागांमध्ये ध्रुवीकरण विशेषतः जास्त चर्चेत आहे.

West Bengal Election Result: West Bengal will be the 'last frontier' for BJP; Will the impact of victory or defeat affect 'Mission UP'? | भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?

भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?

नवी दिल्ली - भाजपासाठी पश्चिम बंगालची निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. जन संघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं होम ग्राऊंड पश्चिम बंगाल आहे त्यामुळे भाजपासाठी हे राज्य मिळवणे गरजेचे बनले आहे. १९५० पासून जनसंघ आणि त्यानंतर भाजपा सातत्याने पश्चिम बंगालमध्ये आपला पाया रचण्याचा प्रयत्न करत आहे. २९३ सदस्यीय पश्चिम बंगाल विधानसभेत भाजपाने अनेक जागा जिंकल्या आहेत परंतु कधीही सत्तेच्या जवळ पोहचू शकली नाही. राजकीय वर्तुळात पश्चिम बंगालला भाजपाचं लास्ट फ्रंटियरही मानले जाते. या राज्यातील विजय किंवा पराजयाचा परिणाम २०२७ मध्ये उत्तर प्रदेशातील भाजपाच्या मोहिमेवरही होईल.

हिंदू मतांचे ध्रुवीकरण

बंगालमध्ये भाजपासाठी एक मोठी कसोटी म्हणजे ते हिंदू मतांचे किती ध्रुवीकरण करू शकतात. आकडेवारीनुसार पश्चिम बंगालमध्ये २५ ते ३० टक्के मुस्लिम मतदार आहेत. भाजपाने येथे घुसखोरीचा मुद्दाही जोरदारपणे उपस्थित केला आहे. भाजपाने उत्तर, मध्य आणि पूर्व भारतातील बहुतांश भागांमध्ये आधीच विजय मिळवला आहे. उत्तर भारतात आता त्यांचे एकमेव प्रमुख राज्य पश्चिम बंगाल शिल्लक आहे, जिथे ते सत्तेपासून खूप दूर आहेत. यामुळेच बंगाल आता भाजपासाठी प्रतिष्ठेच्या लढाईचे रणांगण बनले आहे.

सीमावर्ती भागांमध्ये अधिक मतदार नावे वगळली

या निवडणुकीत विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) हा एक प्रमुख मुद्दा ठरला आहे. मतदार यादीतील बदलांमुळे मोठ्या संख्येने नावे वगळण्यात आली आहेत. ज्यात लक्षणीय संख्येने मुस्लिम मतदारांचा समावेश आहे. मध्य बंगाल, मुर्शिदाबाद, मालदा आणि सीमावर्ती भागांमधून सर्वाधिक मते वगळण्यात आली आहेत. पश्चिम बंगालच्या राजकारणात ध्रुवीकरण हा देखील एक मोठा मुद्दा आहे. शहरी भागांमध्ये ध्रुवीकरण विशेषतः जास्त चर्चेत आहे. हे ध्रुवीकरण  मारवाडी आणि हिंदी भाषिक समुदायांसारख्या गैरबंगाली लोकांमध्ये अधिक तीव्र आहे. हे लोक भाजपाला पाठिंबा देण्याची अधिक शक्यता आहे.

गावांमध्ये हिंदू-मुस्लिम मुद्द्याचा फार कमी प्रभाव

शहरांमध्ये हिंदू-मुस्लिम मुद्द्यांवर चर्चा होत असताना गावांमध्ये ती नगण्य आहे. या निवडणुकीत कोणताही जातीय तणाव किंवा मोठा हिंसाचार झालेला नाही असं माध्यमांच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. पश्चिम बंगालमधील महिला मतदारही महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. महिला मतदार निर्णायक भूमिका बजावत आहेत हे बिहारसह अलीकडील अनेक निवडणुकांमध्ये असे दिसून आले आहे. बिहार आणि मध्य प्रदेशमध्ये महिला मतदारांनी सर्वसाधारणपणे भाजपाला पाठिंबा दिला ज्यामुळे त्यांचा विजय झाला. यावेळी भाजपाने सरकार स्थापन केल्यास बंगालमधील महिला मतदारांना तीन हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे.

बंगालचा विजय मिशन यूपीसाठी बूस्टर डोस!

बंगालमधील विजय आगामी निवडणुकांमध्ये भाजपासाठी एक बूस्टर डोस ठरू शकतो. २०२९ मध्ये लोकसभा निवडणुका होणार असल्याने २०२७ मध्ये भाजप मिशन यूपी अंतर्गत राज्यात जोरदार पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. मोठी राज्ये असल्याने उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल भाजपासाठी महत्त्वपूर्ण आहेत.
 

Web Title : पश्चिम बंगाल: भाजपा का अंतिम मोर्चा; क्या जीत से यूपी मिशन होगा?

Web Summary : भाजपा के लिए पश्चिम बंगाल महत्वपूर्ण, हिंदू वोटों को ध्रुवीकरण करने का लक्ष्य। जीत से उनके 2027 यूपी मिशन को बढ़ावा मिल सकता है। महिलाओं पर ध्यान केंद्रित।

Web Title : West Bengal: BJP's Last Frontier; UP Mission Depends on Victory?

Web Summary : West Bengal crucial for BJP, aiming to polarize Hindu votes. Victory could boost their 2027 UP mission. Focus on women voters with promises.