Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 09:27 IST2026-05-04T09:26:19+5:302026-05-04T09:27:23+5:30

Maharashtra By Election Results 2026: देशातील चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसोबतच महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघात झालेल्या  पोटनिवडणुकीचीही मतमोजणी होत आहे.

Sunetra Pawar is leading in Baramati as expected, but what is Rahuri's trend? Update | Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट

Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट

Baramati Rahuri By-Election Results 2026: देशातील चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसोबतच महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघात झालेल्या  पोटनिवडणुकीचीही मतमोजणी होत आहे. त्यापैकी बारामतीमध्ये अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या सुनेत्रा पवार यांनी आघाडी घेतली आहे. तर अहिल्यानगरमधील राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या अक्षय कर्डिले यांनी आघाडी घेतली आहे.

अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. तसेच सहानुभूतीच्या लाटेमुळे कुठल्याही प्रमुख पक्षाने त्यांच्याविरोधात उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे येथून सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित मानला जात आहे. दरम्यान. आज सुरू असलेल्या मतमोजणीमध्ये सुरुवातीच्या कलांमध्येच सुनेत्रा पवार यांनी तिसऱ्या फेरीअखेर  २६ हजारांहून अधिक मतांनी मोठी आघाडी घेतली आहे. 

दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघातील जागा आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झाली होती. याठिकाणी भाजपाने शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली होती. तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने गोविंद मोकाटे यांना उमेदवारी दिली होती. दरम्यान, आज सुरू असलेल्या मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीतच अक्षय कर्डिले यांनी मोठी आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीत अक्षय कर्डिले यांना ४ हजार  ९८८ एवढी मते मिळाली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी गोविंद मोकाटे यांना ७२२ मते मिळाली आहेत. 
 

Web Title : बारामती में सुनेत्रा पवार आगे; राहुरी में करडिले का दबदबा: अपडेट

Web Summary : बारामती उपचुनाव में सुनेत्रा पवार आगे। राहुरी में भाजपा के अक्षय करडिले अपने पिता की मृत्यु के बाद राकांपा के गोविंद मोकाटे से शुरुआती दौर में आगे चल रहे हैं।

Web Title : Sunetra Pawar leads in Baramati; Rahuri favors Kardile: Updates

Web Summary : In Baramati by-election, Sunetra Pawar leads, as expected. In Rahuri, BJP's Akshay Kardile is ahead after his father's death, leading against NCP's Govind Mokate in initial rounds.