West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 10:13 IST2026-05-04T10:08:39+5:302026-05-04T10:13:06+5:30

पश्चिम बंगालमध्ये २५ जिल्ह्यातील ७७ जागांवर मतमोजणी सुरू आहे. राज्यातील सर्व मतमोजणी केंद्रावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे

West Bengal Assembly Election Result 2026: How many votes are needed for a majority in West Bengal?; BJP is preparing to create history | West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत

West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत

कोलकाता - पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजपा इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. निकालाच्या सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली असून सत्ताधारी टीएमसीला मोठा धक्का बसला आहे. टीएमसीचे अनेक दिग्गज पिछाडीवर आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपा १४० हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. मॅजिक फिगरपासून काहीच अंतर दूर असणाऱ्या भाजपाला बंगालमधून टीएमसीला सत्तेतून हद्दपार करण्यात यश मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पश्चिम बंगालमधील २९४ जागांपैकी २९३ जागांसाठी आज मतमोजणी होत आहे. एका जागेवर २१ तारखेला पुन्हा मतदान होईल आणि २४ मे रोजी त्याचा निकाल लागेल.

केरळमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी, ९६ जागांवर घेतली आघाडी

पश्चिम बंगालमध्ये २५ जिल्ह्यातील ७७ जागांवर मतमोजणी सुरू आहे. राज्यातील सर्व मतमोजणी केंद्रावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. पश्चिम बंगालमध्ये एकूण २९४ जागा असून याठिकाणी बहुमतासाठी १४८ जागांचा आकडा हवा. बंगालमध्ये २ टप्प्यात निवडणुकीसाठी मतदान झाले. पहिल्या टप्प्यात २३ एप्रिलला १५२ जागांवर मतदान झाले तर दुसऱ्या टप्प्यात २९ एप्रिलला १४२ जागांसाठी मतदान झाले होते. फाल्टा विधानसभा जागेसाठी २१ मे रोजी मतदान पार पडेल. पश्चिम बंगालच्या झालग्राम जिल्ह्यात जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी झालमुरी येथे राहिले होते, तेथील सर्व जागांवर भाजपा आघाडीवर आहे. या जिल्ह्यात विधानसभेच्या तीन जागा आहेत.

ममता बॅनर्जी यांची जागा धोक्यात?

पश्चिम बंगालच्या भवानीपूर मतदारसंघात ममता बॅनर्जी निवडणूक लढवत आहेत. याठिकाणी भाजपाचे सुवेंद्रु अधिकारी ममता बॅनर्जी यांना टक्कर देत आहेत. या जागेवरील मतमोजणीत सुवेंद्र अधिकारी काही वेळ आघाडीवर होते. परंतु त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी भाजपा उमेदवारावर आघाडी घेतली. येथे सुरुवातीच्या कलांवर भाष्य करताना अधिकारी यांनी दावा केला की, भाजपा सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत आहे आणि पक्षाला १३५ पेक्षा जास्त जागा मिळतील असा अंदाज वर्तवला. सुरुवातीच्या कलांनुसार हिंदू मतदार भाजपाच्या मागे खंबीरपणे एकवटले आहेत, जे एक खूप चांगले लक्षण आहे असं त्यांनी म्हटलं. 

दरम्यान, मतमोजणीच्या कलांमधून बंगालमध्ये काही रंजक घडामोडी समोर येत आहेत. अलीपूरद्वार आणि जलपाईगुडीसारख्या उत्तर बंगालमधील आपल्या बालेकिल्ल्यांमध्ये भाजपाने आघाडी कायम राखली असली तरी आदिवासीबहुल मेदिनीपूर आणि कोलकाता व आसपासच्या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या प्रेसिडेंसी प्रदेशातील काही भागांसारख्या पूर्वी आवाक्याबाहेर असलेल्या भागांमध्येही भाजपाने लक्षणीय मुसंडी मारली आहे.

Web Title : पश्चिम बंगाल चुनाव 2026: बहुमत के लिए कितनी सीटें चाहिए; भाजपा इतिहास रचने को तैयार।

Web Summary : पश्चिम बंगाल चुनाव में भाजपा की बढ़त, टीएमसी को चुनौती। भाजपा 140 से अधिक सीटों पर आगे, बहुमत 148 के करीब। ममता बनर्जी भवानीपुर से चुनाव लड़ रही हैं, सुवेंदु अधिकारी का मुकाबला। भाजपा ने उत्तरी बंगाल में बढ़त बनाए रखी।

Web Title : West Bengal Election 2026: Seats needed for majority; BJP prepares for history.

Web Summary : BJP surges in West Bengal elections, challenging TMC. BJP leads in over 140 seats, nearing the majority mark of 148. Mamata Banerjee contests from Bhawanipur, facing Suvendu Adhikari. BJP maintains lead in North Bengal strongholds.