Vijay's TVK: अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 11:51 IST2026-05-04T11:49:28+5:302026-05-04T11:51:24+5:30

या घटनेनंतर परिसरात तणाव पाहता पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली. मतमोजणी केंद्राजवळ आणि संवेदनशील क्षेत्रात कडेकोट सुरक्षा ठेवली होती.

Tamilnadu Assembly Election Result 2026: Hearing the rumour of actor Vijay TVK Party defeat, a fan took a shocking step in Krishnagiri | Vijay's TVK: अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ

Vijay's TVK: अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ

चेन्नई - राजकारण आणि सिनेमा यांचं समीकरण तामिळनाडूसाठी नवीन नाही. परंतु कधी कधी हे अतिप्रेम जीवघेणे ठरू शकते. कृष्णागिरी येथे सोमवारी सकाळी एक खळबळजनक घटना घडली, ज्याने सगळेच हैराण झाले. याठिकाणी तामिळ सुपरस्टार आणि TVK पक्षाचे नेते अभिनेता विजय यांच्या २८ वर्षीय चाहत्याने निकालाबाबत अफवा ऐकून स्वत:चा जीव देण्याचा प्रयत्न केला.

अफवा जीवावर बेतली

पोलिसांच्या माहितीनुसार, के. महेंद्रन हा २८ वर्षीय युवक अभिनेता विजय यांचा मोठा चाहता आहे. तो विजय यांच्या TVK पक्षाचा कट्टर समर्थकही बनला होता. सोमवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा शहरात विजय यांच्या पराभवाची अफवा पसरली. ही बाब समजताच महेंद्रन याचे मानसिक खच्चीकरण झाले. त्याने आपल्या घराजवळच एका धारदार शस्त्राने गळा कापला. महेंद्रन याला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून आसपासचे लोक तातडीने त्याच्या मदतीला धावून आले. त्यानंतर लोकांनी त्याला जखमी अवस्थेत कृष्णागिरी सरकारी मेडिकल हॉस्पिटलला दाखल केले. या युवकाला गंभीर जखम झाली असून तो सध्या आयसीयूत आहे. 

सुरक्षा व्यवस्था वाढवली

या घटनेनंतर परिसरात तणाव पाहता पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली. मतमोजणी केंद्राजवळ आणि संवेदनशील क्षेत्रात कडेकोट सुरक्षा ठेवली होती. जेणेकरून समर्थकांमध्ये कुठलीही हिंसाचाराची घटना घडू नये आणि अशाप्रकारे अनुचित प्रकार रोखता यावा याची खबरदारी पोलीस प्रशासनाने घेतली होती.

निकालात TVK चा बोलबाला

दरम्यान, तामिळनाडू येथील निवडणूक निकालात अभिनेता विजय यांच्या टीवीके पक्षाच्या कामगिरीने सगळ्यांना आश्चर्यचकीत केले आहे. याठिकाणी सुरुवातीच्या कलांमध्ये टीवीके १०९ जागांवर आघाडीवर आहे तर सत्ताधारी डीएमके ५२ जागांवर पुढे आहे. विजय यांच्या पक्षाच्या कामगिरीमुळे सत्ताधारी डीएमके सत्तेतून पायउतार होण्याची शक्यता आहे. याठिकाणी भाजपा आणि एआयडिएमके ७४ जागांवर आघाडीवर आहे. 

Web Title : विजय की हार की अफवाह: कृष्णागिरी में प्रशंसक का चरम कदम, हंगामा

Web Summary : कृष्णागिरी में विजय के एक प्रशंसक ने अभिनेता की पार्टी की हार की अफवाहों के बाद आत्महत्या का प्रयास किया। वह गंभीर हालत में अस्पताल में भर्ती है। इस घटना के बाद सुरक्षा बढ़ा दी गई है क्योंकि चुनाव में विजय की टीवीके पार्टी आगे है।

Web Title : Vijay's Rumored Loss: Fan's Extreme Act Sparks Uproar in Krishnagiri

Web Summary : A Vijay fan in Krishnagiri attempted suicide after rumors of the actor's party's defeat spread. He is hospitalized in critical condition. The incident prompted heightened security measures amidst surprising election results where Vijay's TVK party is leading.