Suvendu Adhikari : "हिंदूंनी ममतांना धडा शिकवला, अत्याचारांचा बदला मतदानातून घेतला", शुभेंदु अधिकारी कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 12:30 IST2026-05-04T12:28:35+5:302026-05-04T12:30:50+5:30

Suvendu Adhikari And Mamata Banerjee : भाजपा मोठ्या विजयाच्या दिशेने कूच करताना दिसत आहे. याच दरम्यान भाजपा नेते शुभेंदु अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Suvendu Adhikari slams Mamata Banerjee west bengal election results trends bjp | Suvendu Adhikari : "हिंदूंनी ममतांना धडा शिकवला, अत्याचारांचा बदला मतदानातून घेतला", शुभेंदु अधिकारी कडाडले

Suvendu Adhikari : "हिंदूंनी ममतांना धडा शिकवला, अत्याचारांचा बदला मतदानातून घेतला", शुभेंदु अधिकारी कडाडले

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. जसजशी मतमोजणी पुढे सरकत आहे, तसतसा भाजपाचा आकडाही वाढत चालला आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपा आणि टीएमसी (TMC) मध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली, परंतु आता भाजपा मोठ्या विजयाच्या दिशेने कूच करताना दिसत आहे. याच दरम्यान भाजपा नेते शुभेंदु अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

निवडणुकीच्या कलांमध्ये आपला विजय आणि टीएमसीचा पराभव स्पष्ट दिसू लागताच, शुभेंदु यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, "बंगालच्या हिंदूंनी त्यांना (ममतांना) मोठा धडा शिकवला आहे."

राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश

"हिंदूंवर झालेल्या अत्याचारांचा बदला जनतेने मतदानातून घेतला"

मीडियाशी संवाद साधताना शुभेंदु अधिकारी अत्यंत आत्मविश्वासात दिसले. ममता बॅनर्जी यांचा अभेद्य किल्ला मानल्या जाणाऱ्या 'भवानीपूर' मध्येही यावेळी भाजपाने मुसंडी मारली असून मुख्यमंत्र्यांचा तिथून पराभव निश्चित आहे असा दावा त्यांनी केला. शुभेंदु म्हणाले, "मी भवानीपूरच्या त्या प्रत्येक हिंदू मतदाराचे आभार मानतो ज्यांनी माझ्यासाठी मतदान केलं. हे निकाल आमच्या अपेक्षेप्रमाणेच आहेत. हिंदूंवर झालेल्या अत्याचारांचा बदला जनतेने मतदानातून घेतला आहे."

धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले

"तृणमूल काँग्रेस १०० जागांचा आकडाही पार करू शकणार नाही"

शुभेंदु यांनी एक मोठा दावा करताना सांगितलं की, तृणमूल काँग्रेस यावेळी १०० जागांचा आकडाही पार करू शकणार नाही. मालदा, मुर्शिदाबाद आणि मोथाबाडी सारख्या ठिकाणांचा उल्लेख करत ते म्हणाले की, 'अँटी-इंकम्बन्सी' आणि हिंदूंवर झालेल्या अत्याचारामुळे ममता बॅनर्जींचं राजकारण संपुष्टात आलं आहे. राज्यात भाजपा पूर्ण बहुमतासह पहिल्यांदाच सरकार स्थापन करणार असल्याचंही शुभेंदु अधिकारी यांनी ठामपणे सांगितलं.

Web Title : हिंदुओं ने ममता को सिखाया सबक; वोट से बदला: सुवेंदु अधिकारी

Web Summary : सुवेंदु अधिकारी का दावा है कि हिंदुओं ने वोट के माध्यम से अत्याचारों का बदला लिया, पश्चिम बंगाल में टीएमसी की हार और भाजपा की बहुमत से जीत की भविष्यवाणी की। उन्होंने हिंदू मतदाताओं को धन्यवाद दिया, और कहा कि ममता बनर्जी का शासन सत्ता विरोधी लहर के कारण समाप्त हो रहा है।

Web Title : Hindus Taught Mamata a Lesson; Revenge Through Vote: Suvendu Adhikari

Web Summary : Suvendu Adhikari claims Hindus avenged atrocities through votes, predicting TMC's defeat and BJP's victory in West Bengal with a majority. He thanked Hindu voters, asserting Mamata Banerjee's reign is ending due to anti-incumbency.