"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 12:16 IST2026-05-04T12:14:54+5:302026-05-04T12:16:54+5:30

Sunetra Pawar on Baramati Election Result 2026: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाचे चित्र आता स्पष्ट झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) उमेदवार आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

Sunetra Pawar Clinches Decisive Victory in Baramati Assembly Bypoll; Dedicates Win to Late Ajit Pawar | "हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!

"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!

Baramati Bypoll Election Result 2026: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाचे चित्र आता स्पष्ट झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) उमेदवार आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी विजयाकडे मोठी झेप घेतली आहे. नवव्या फेरीअखेर मिळालेल्या आकडेवारीनुसार, सुनेत्रा पवार यांचा विजय आता केवळ औपचारिकता उरला आहे.  विजयाचे चित्र स्पष्ट होताच सुनेत्रा पवार यांनी एक्सवर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. 

सुनेत्रा पवार म्हणाल्या की, "आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना आपण सर्वांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास मी आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करते. आजचा हा निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आपण सर्वजण भावूक आहोत. दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की, या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया."

बारामतीकरांचे आभार मानताना त्यांनी भविष्यातील वाटचालीचे संकेत दिले आहेत.  त्यांनी म्हटले आहे की, "हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे. निर्धाराची, संघर्षाची आणि नव्या बारामतीची! दादांच्या स्वप्नातील बारामती घडवण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांची ऋणी आहे." या विजयामुळे बारामतीच्या राजकीय वर्तुळात सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व अधिक भक्कम झाले असून, नव्या बारामतीच्या निर्मितीसाठी त्यांनी आता कंबर कसली आहे.

बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत पहिल्या फेरीपासूनच सुनेत्रा पवार यांनी आपले वर्चस्व कायम राखले. अत्यंत चुरशीच्या मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीत नवव्या फेरीअखेर सुनेत्रा पवार यांनी ७७ हजार १०३ मतांची प्रचंड आघाडी घेत विजयाच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकले. अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी झालेली ही निवडणूक कौटुंबिक आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानली जात होती.

Web Title : यह अंत नहीं, सिर्फ शुरुआत: सुनेत्रा पवार की भावुक अपील

Web Summary : सुनेत्रा पवार ने बारामती में जीत हासिल की, इसे अजित पवार की स्मृति को समर्पित किया। उन्होंने समर्थकों से जश्न से बचने और उनके आदर्शों पर ध्यान केंद्रित करने का आग्रह किया। पवार ने एक नए बारामती की कल्पना की, उपचुनाव के बाद भविष्य की प्रगति के लिए आभार और दृढ़ संकल्प व्यक्त किया।

Web Title : Not the End, Just the Beginning: Sunetra Pawar's Emotional Appeal

Web Summary : Sunetra Pawar secures Baramati victory, dedicating it to Ajit Pawar's memory. She urges supporters to avoid celebrations, focusing on his ideals. Pawar envisions a new Baramati, expressing gratitude and determination for future progress after the by-election.