मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 12:44 IST2026-05-04T12:30:08+5:302026-05-04T12:44:46+5:30

विजय यांनी निवडणुकीच्या प्रचारात दिलेल्या २ प्रमुख आश्वासनांमुळे तामिळनाडूत बरीच चर्चा झाली. मुलींना लग्नावेळी ८ ग्रॅम सोने आणि महिलांना मोफत सिलेंडर देण्याचं वचन प्रचारात लोकांना दिले होते.

Free 8 grams of gold and Rs. 2500 per month...; What are the 5 promises that worked the magic of actor Vijay in Tamilnadu Election Result 2026 | मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?

मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत सुरुवातीच्या कलांमध्ये अभिनेता विजय यांच्या टीवीके पक्षाला प्रचंड यश मिळताना दिसत आहे. विधानसभेच्या २३४ जागांपैकी १०० हून अधिक जागांवर विजय यांच्या टीवीके पक्षाला आघाडी मिळाली आहे. ५१ वर्षीय विजय यांनी २०२४ साली फिल्म इंडस्ट्रीतून राजकारणाच्या दिशेने वाटचाल सुरू केली. विजय यांनी निवडणुकीच्या प्रचारात दिलेल्या २ प्रमुख आश्वासनांमुळे तामिळनाडूत बरीच चर्चा झाली. मुलींना लग्नावेळी ८ ग्रॅम सोने आणि महिलांना मोफत सिलेंडर देण्याचं वचन प्रचारात लोकांना दिले होते.

अभिनेता विजय यांच्या आश्वासनामुळे तामिळनाडूत एम.के स्टॅलिन यांच्या डीएमके पक्षाची १० वर्षाची सत्ता उलथावून लावली आहे. विजय यांनी त्यांच्या प्रचारात विविध आश्वासने लोकांना दिली होती. आता ती आश्वासने पूर्ण करण्याची जबाबदारी विजय यांच्यावर आली आहे. विजय यांच्या पक्षाच्या कामगिरीने अनेकांना आश्चर्यचकीत केले आहे. नेमकी विजय यांच्या पक्षाने कोणती आश्वासने लोकांना दिली, त्यातील ५ प्रमुख आश्वासने ज्याने तामिळनाडूच्या निकालात विजय यांची जादू चालली हे जाणून घेऊया. 

१) जाहीरनामा प्रकाशित करताना विजय यांनी म्हटलं होते की, तामिळनाडूत लग्न करताना प्रत्येक मुलीला ८ ग्रॅम सोने सरकारकडून देण्यात येईल. ही सरकारी मदत म्हणून कुटुंबाला भेट दिली जाईल. विजय यांच्या पक्षाने सोन्यासोबत मुलींना लग्नासाठी एक साडी आणि इतर भेटवस्तू दिल्या जातील असं जाहीर केले होते.

२) विजय यांच्या टीवीके पक्षाने राज्यातील महिलांसाठी दर महिना २५०० रूपये देण्याची घोषणा केली होती. त्याशिवाय वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींची पेन्शन दरमहा ३ हजारांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला जाईल असं आश्वासन त्यांनी दिले.

३) जर आमचा पक्ष सत्तेत आला तर जे लोक भूमिहिन आहेत अशा लोकांना सरकारकडून मोफत जमीन दिली जाईल. गरीब लोकांना शासकीय जमीन भाडेपट्ट्यावर दिली जाईल असं आश्वासन टीवीकेने लोकांना दिले होते.

४) अभिनेता विजय यांच्या पक्षाने सर्व कुटुंबांना घरगुती मदतीसाठी दरवर्षी २०० युनिट वीज आणि सहा मोफत गॅस सिलिंडर देण्याची घोषणा केली. टीवीकेने महिलांना ५ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचे आश्वासनही दिले.

५) तरुणांना आकर्षित करण्यासाठी टीवीकेने पदवीधरांना ४,००० रुपयांची बेरोजगारी मदत जाहीर केली. तसेच इंटर्नशिपसाठी ५,००,००० लोकांना भरती करण्याचे आश्वासन दिले. पुढील पाच वर्षांत ५,००,००० सरकारी नोकऱ्या निर्माण करण्याची घोषणा टीवीकेने केली तसेच २५ लाख रुपयांचे कर्ज देण्याचे आश्वासन दिले होते. 

Web Title : विजय के चुनावी वादे: मुफ्त सोना, मासिक वजीफा और भूमि अनुदान।

Web Summary : अभिनेता विजय की टीवीके पार्टी को तमिलनाडु चुनावों में मिली बढ़त, मुफ्त सोना, महिलाओं के लिए मासिक वजीफा, भूमिहीनों को भूमि, मुफ्त बिजली और गैस सिलेंडर, और स्नातकों को बेरोजगारी सहायता का वादा, स्थापित दलों को चुनौती।

Web Title : Vijay's Election Promises: Free Gold, Monthly Stipends, and Land Grants.

Web Summary : Actor Vijay's TVK party gains ground in Tamil Nadu elections, promising free gold, monthly stipends for women, land for the landless, free electricity and gas cylinders, and unemployment assistance to graduates, challenging established parties.