ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 13:54 IST2026-05-04T13:53:12+5:302026-05-04T13:54:12+5:30

West Bengal Election Result Live 2026: भवानीपूर विधानसभा मतदारसंघात ममता बॅनर्जी आणि सुवेंदू अधिकारी यांच्यात चुरस.

West Bengal Election Result Live 2026: Mamata Banerjee vs. Suvendu Adhikari...! Seven rounds have been held in Bhawanipur so far, the results of each round have been announced... | ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...

ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...

पश्चिम बंगालच्या राजकारणातील सर्वात 'हॉट सीट' मानल्या जाणाऱ्या भवानीपूर विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करण्यास सुरुवात केली आहे. मतमोजणीच्या सातव्या फेरीअखेर ममता बॅनर्जी यांनी भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांच्यावर १७,३७१ मतांची मोठी आघाडी घेतली आहे.

सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जींना जोरदार टक्कर दिली होती. दुसऱ्या फेरीअखेर अधिकारी यांनी आपली पिछाडी कमी करत कडवी झुंज दिली होती, मात्र चौथ्या फेरीपासून ममता बॅनर्जींनी घेतलेली आघाडी सातव्या फेरीपर्यंत वाढतच गेली.

भवानीपूरमधील मतमोजणीचे चित्र (महत्त्वाचे टप्पे):

चौथी फेरी: इथेच खऱ्या अर्थाने ममता बॅनर्जींनी मोठी झेप घेतली. त्यांना या फेरीत ७,८८५ मते मिळाली, तर सुवेंदू अधिकारींना केवळ ३०१ मतांवर समाधान मानावे लागले.

पाचवी फेरी: ममतांची आघाडी १६,७०६ मतांवर पोहोचली.

सातवी फेरी: सातव्या फेरीअखेर ममता बॅनर्जी ३२,८२२ मतांसह आघाडीवर आहेत, तर सुवेंदू अधिकारी १५,४५१ मतांसह पिछाडीवर आहेत.

ममता बॅनर्जींचा 'अभेद्य' गड
१९५१ पासून अस्तित्वात असलेला भवानीपूर मतदारसंघ हा ममता बॅनर्जींसाठी नेहमीच सुरक्षित राहिला आहे. २०११, २०१६ आणि २०२१ (पोटनिवडणूक) अशा तिन्ही वेळेस त्यांनी येथून विजय मिळवला आहे. २०२१ मध्ये नंदीग्राममध्ये पराभव स्वीकारावा लागल्यानंतर याच मतदारसंघाने त्यांना ५८ हजारांच्या विक्रमी मताधिक्याने निवडून देत मुख्यमंत्रीपद टिकवून ठेवण्यास मदत केली होती.

यावेळेस ८६.७१ टक्के इतके विक्रमी मतदान झाले असून, सुरुवातीचे कल पाहता भवानीपूरचा हा किल्ला ममता बॅनर्जी पुन्हा एकदा सर करतील, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

फेरीममता बॅनर्जी (एकूण मते)सुवेंदू अधिकारी (एकूण मते)मतांमधील फरककोणाची आघाडी?
१ ली फेरी३,६६६१,६७०१,९९६ममता बॅनर्जी
२ री फेरी४,८२२६,३८०१,५५८सुवेंदू अधिकारी
३ री फेरी९,३५९८,४६१८९८ममता बॅनर्जी
४ थी फेरी१७,२४४८,७६२८,४८२ममता बॅनर्जी
५ वी फेरी२५,९४२९,२३६१६,७०६ममता बॅनर्जी
६ वी फेरी३०,५४८११,१५५१९,३९३ममता बॅनर्जी
७ वी फेरी३२,८२२१५,४५११७,३७१ममता बॅनर्जी

Web Title : ममता बनर्जी बनाम सुवेंदु अधिकारी: भवानीपुर में सात दौर, परिणाम आए!

Web Summary : भवानीपुर में सात दौर के बाद ममता बनर्जी सुवेंदु अधिकारी से आगे। बनर्जी ने महत्वपूर्ण बढ़त हासिल की, खासकर चौथे दौर से, निर्वाचन क्षेत्र में अपनी पकड़ की पुष्टि की। वह 17,371 वोटों से आगे हैं।

Web Title : Mamata Banerjee vs. Suvendu Adhikari: Seven Rounds in Bhabanipur, Results In!

Web Summary : Mamata Banerjee leads against Suvendu Adhikari in Bhabanipur after seven rounds. Banerjee secured a significant lead, especially from the fourth round onward, reaffirming her stronghold in the constituency. She is ahead by 17,371 votes.