Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 14:49 IST2026-05-04T14:48:48+5:302026-05-04T14:49:33+5:30

Flight Hits Truck At US Airport: अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये एका विमानाचा अपघात घडला. विमान धावपट्टीवर उतरत असतानाच ट्रकला धडकले. या घटनेचा तपास आता सुरू करण्यात आला आहे. 

Airplane Accident: Plane hits truck while landing; Watch video of incident near New York airport | Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा

Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा

यूनायटेड एअरलाइन्सच्या बोईंग विमानाचा धावपट्टीवर उतरत असताना अपघात झाला. विमान उतरत असताना एका खांबाला आणि त्यानंतर ट्रकला धडकले. सुदैवाने या अपघातानंतरही विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले. या घटनेत ट्रकचालक गंभीर जखमी झाला आहे. फेडरल एव्हिएशन प्रशासनाने या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 

फेडरल एव्हिएशन प्रशासनाने सांगितले की, यूनायटेड एअरलाइन्सचे १६९ (बोईंग ७६७) हे विमान नेवार्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत होते. रविवारी (३ मे) स्थानिक वेळेनुसार दुपारी २ वाजता ही घटना घडली. 

हे विमान व्हेनिसवरून येत होते. या विमानात २२१ प्रवासी आणि १० क्रू मेंबर्स होते. विमान नेवार्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना खांबाला धडकले आणि त्यानंतर ट्रकला धडकले. या घटनेत ट्रक चालक जखमी झाला असून, विमानाचेही नुकसान झाले आहे. 

विमानाचे हे एक चाक ट्रकचालकाच्या खिडकीवरच आदळले. ट्रकचालकाला काही जखमा झाल्या असल्याचे चक पॅटराकीस यांनी सांगितले. विमानातील सर्व प्रवासी सुखरुप असून, या घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार आहे.

Web Title : न्यूयॉर्क एयरपोर्ट पर उतरते समय विमान ट्रक से टकराया।

Web Summary : यूनाइटेड एयरलाइंस का बोइंग 767 विमान, वेनिस से उड़ान UA169, नेवार्क लिबर्टी अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे पर उतरते समय एक ट्रक से टकरा गया। ट्रक ड्राइवर घायल हो गया। सभी 221 यात्री और 10 क्रू सदस्य सुरक्षित हैं। एफएए जांच कर रहा है।

Web Title : Airplane hits truck during landing at New York airport.

Web Summary : A United Airlines Boeing 767, flight UA169 from Venice, struck a truck while landing at Newark Liberty International Airport. The truck driver was injured. All 221 passengers and 10 crew members were safe. The FAA is investigating.