दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 16:45 IST2026-05-04T16:42:16+5:302026-05-04T16:45:59+5:30

Mamata Banerjee West Bengal Election: २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस भाजपावर भारी पडली होती. पण, अवघ्या दोन वर्षानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने ममतांना सत्तेवरून हटवले. 

why tmc lost west bengal What has changed in West Bengal in two years that Mamata Banerjee had to step down from power? | दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?

दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?

पश्चिम बंगालमध्येभाजपाने कल्पनेपलिकडचे यश मिळवले. १४७ बहुमताचा आकडा असलेल्या पश्चिम बंगालमध्येभाजपाने दोनशेपर्यंत मजल मारली आहे. तर दुसरीकडे सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसला ८८ जागांवरच आघाडी मिळाली आहे. बंगालमधील हे राजकारण दोन वर्षात पूर्णपणे बदलेलं दिसलं. बरोबर दोन वर्षांपूर्वी लोकसभेच्या निवडणुकीत ममतांच्या तृणमूल काँग्रेसने बंगालमध्ये भाजपाला मर्यादित जागांवर रोखत २९ जणांना निवडून आणले. पण, आता ममतांच्या हातातील सत्ताच भाजपाने हिसकावून घेतली. भाजपाने हे राजकीय गणित दोन वर्षात कसं बदललं?

२०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या. तृणमूल काँग्रेसने भाजपाचे आव्हान रोखत २९ जागा जिंकल्या, तर भाजपाला केवळ १२ जागांवरच विजय मिळवता आला. त्यांना ६ जागा गमवाव्या लागल्या. हे तृणमूलचे मोठे यश होते कारण त्यापूर्वी म्हणजे २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला २२ जागा जिंकता आल्या होत्या. पण, या निकालानंतर भाजपाने पश्चिम बंगालवर लक्ष्य केंद्रित केले आणि सत्तेचं सिंहासन गाठले. 

भ्रष्टाचार आणि घोटाळे

मागील १५ वर्षांपासून पश्चिम बंगालमध्ये सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या पराभवाला ज्या गोष्टी कारणीभूत ठरल्या, त्यात गंभीर स्वरुपाचा भ्रष्टाचार, घोटाळे आणि आरजीकर रुग्णालयातील अत्याचार प्रकरण. मागील दोन वर्षात तृणमूलच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले आणि तेच मुद्दे भाजपाने लोकांवर बिंबवले. त्यामुळे तृणमूलची प्रतिमा डागाळली गेली. 

शिक्षक भरती, रेशनमधील गैरव्यवहाराने पक्षाचे नुकसान

तृणमूलचे सरकार असताना शिक्षक भरती झाली. त्यात अनियमितता झाल्याचे प्रकरण गाजले. इतकंच नाही, तर रेशनमध्येही गैरव्यवहार झाल्याच्या प्रकरणाने ममता सरकारची प्रतिमा वाईट केली. हेच मुद्दे भाजपाकडून उचलले गेले. त्यात भाजपाने आणखी एका मुद्द्याची भर घातली ती म्हणजे महिला सुरक्षा. याच मुद्द्यावरून भाजपाने वारंवार ममता बॅनर्जींच्या सरकारला घेरण्याचे प्रयत्न केले. 

पीडितेच्या आईलाच उमेदवारी

कोलकात्यातील आरजी कर महाविद्यालयात अत्याचार आणि हत्या झालेल्या पीडित डॉक्टर तरुणीच्या आईलाच उमेदवारी दिली. त्याचा थेट फायदा निवडणुकीत भाजपाला झाला. यात आणखी एक घटक महत्त्वाचा ठरला तो म्हणजे सरकारविरोधात असलेली नाराजी. त्या नाराजीच्या विस्तवाला भाजपाने आणखी हवा दिली. 

घुसखोरांचा मुद्दा

भाजपाने या निवडणुकीत बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्द्याचा ममता सरकारविरोधात वापर केला. ममता बॅनर्जी यांचे सरकार सीमेवर सुरक्षा जाळे उभारण्यास अडथळे आणत असल्याचा आरोप भाजपाकडून केला गेला. त्याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये घुसखोर मतदान करत असल्याचा मुद्दाही अधोरेखित केला गेला. 

हिंदुत्वाचा मुद्दा

भाजपाकडून पश्चिम बंगालमध्ये गेल्या दोन वर्षात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही जोर दिला गेला. हिंदू महिलांची सुरक्षा, तृणमूल काँग्रेसचे धोरण यावरही लक्ष्य केले गेले.  ममतांचे सरकार हे हिंदू विरोधी असल्याचा प्रचार भाजपाकडून केला गेला. त्यासाठी वेगवेगळ्या हिंदू सण उत्सवावेळी झालेल्या संघर्षाच्या घटनांचे दाखले दिले गेले. 

Web Title : पश्चिम बंगाल: ममता बनर्जी दो साल में सत्ता क्यों हार गईं?

Web Summary : भ्रष्टाचार, चुनावी कदाचार और आर.जी. कर अस्पताल की घटना ने ममता बनर्जी की छवि को नुकसान पहुंचाया। बीजेपी ने इन मुद्दों को उजागर किया, जन असंतोष और महिलाओं की सुरक्षा तथा अवैध आप्रवासन के बारे में चिंताओं का फायदा उठाया। हिंदुत्व पर ध्यान केंद्रित करने से भी भूमिका निभाई।

Web Title : West Bengal: Why did Mamata Banerjee lose power in two years?

Web Summary : Corruption, electoral malpractices, and the R.G. Kar hospital incident damaged Mamata Banerjee's image. BJP highlighted these issues, exploiting public dissatisfaction and concerns about women's safety and illegal immigration. Focus on Hindutva also played a role.