जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 17:11 IST2026-05-04T17:10:41+5:302026-05-04T17:11:30+5:30

Iran US War Updates: इराणने अमेरिकन नौदलाच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे 'प्रोजेक्ट फ्रीडम' आणि होर्मुज सामुद्रधुनीतील वाढता तणाव.

Iran US War Updates World sensation: Iran's missile attack on American warship; Two missiles fired, truce broken, war will break out again | जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार

जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार

तेहरान/वॉशिंग्टन: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. इराणच्या 'फार्स' न्यूज एजन्सीने दावा केला आहे की, जास्क जवळ अमेरिकन नौदलाच्या एका युद्धनौकेवर इराणने दोन क्षेपणास्त्रे डागली आहेत. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने दिलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा हल्ला केल्याचे इराणने म्हटले आहे. या घटनेमुळे दोन्ही देशांमधील युद्धविराम संपुष्टात आल्याचे मानले जात असून अमेरिकेने इराणवर मोठ्या हल्ल्याची तयारी सुरू केली आहे.

हा हल्ला अशा वेळी झाला आहे जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी "प्रोजेक्ट फ्रीडम" सुरू करण्याची घोषणा केली होती. होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये अडकलेल्या व्यापारी जहाजांना सुरक्षित रस्ता दाखवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. यासाठी अमेरिकेने १५,००० सैनिक, १०० हून अधिक विमाने आणि अत्याधुनिक युद्धनौका तैनात केल्या आहेत. मात्र, इराणने या मोहिमेला तीव्र विरोध दर्शवला असून आपल्या क्षेत्रात कोणत्याही लष्करी कारवाईला परवानगी देणार नाही, असा इशारा दिला आहे.

अमेरिकेचा दावा: "बातमी खोटी आणि बनावट"
इराणने अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला केल्याचा दावा केला असला तरी, अमेरिकेने हा दावा फेटाळून लावला आहे. एका अमेरिकन अधिकार्‍याने अल जझीराशी बोलताना सांगितले की, "इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने दिलेला हा रिपोर्ट पूर्णपणे बनावट आणि खोटा आहे. आमच्या कोणत्याही जहाजावर हल्ला झालेला नाही."

फ्रान्सने झटकले हात; युरोपचा स्वतंत्र पवित्रा
एकीकडे अमेरिका आक्रमक असताना, फ्रान्सने मात्र या मोहिमेत सहभागी होण्यास नकार दिला आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी स्पष्ट केले की, युरोप स्वतःचे सुरक्षा उपाय तयार करत असून ते अमेरिकेच्या या अस्पष्ट मोहिमेत सहभागी होणार नाहीत. मॅक्रॉन यांनी चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले आहे.

इस्रायल-लेबनॉन युद्धातही तणाव वाढला
दुसरीकडे, इस्रायलने गाझामध्ये "ऑरेंज लाईन" जाहीर करून आपले नियंत्रण वाढवले आहे, तर लेबनॉनमध्ये हिजबुल्ला आणि इस्रायली सैन्यामध्ये भीषण भूदलाची लढाई सुरू आहे. या बहुआयामी संघर्षाने पश्चिम आशियातील परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली आहे.

Web Title : अमेरिकी युद्धपोत पर ईरानी मिसाइल हमले से युद्ध का खतरा मंडराया।

Web Summary : ईरान ने अमेरिकी युद्धपोत पर मिसाइल हमले का दावा किया; अमेरिका ने इनकार किया। होर्मुज जलडमरूमध्य में तनाव बढ़ा। फ्रांस ने अमेरिका के 'प्रोजेक्ट फ्रीडम' में शामिल होने से इनकार किया, वार्ता का समर्थन किया। इज़राइल-लेबनान संघर्ष तेज, पश्चिम एशिया में विस्फोटक स्थिति।

Web Title : Iran missile strike on US warship sparks war fears.

Web Summary : Iran claims missile attack on US warship; US denies. Tensions escalate in Hormuz Strait. France declines involvement in US's 'Project Freedom', advocating dialogue. Israel-Lebanon conflict intensifies, creating volatile West Asia situation.