दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 16:48 IST2026-05-04T16:46:25+5:302026-05-04T16:48:13+5:30

उन्हाळ्यात कुलर रोज ८ तास चालवल्यास महिन्याला किती वीज बिल येते? वॉटनुसार युनिट्स आणि पैशांचा हिशोब जाणून घ्या.

Running the cooler for 8 hours a day? How much will the electricity bill be per month? Find out the cost per watt! | दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!

दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!

कडक उन्हाळा आणि घामाच्या धारांपासून वाचण्यासाठी कुलर हा सर्वसामान्यांसाठी सर्वात मोठा आधार असतो. पण अनेकदा भीती असते ती म्हणजे महिन्याच्या शेवटी येणाऱ्या वीज बिलाची. जर तुम्ही रोज ८ तास कुलर चालवत असाल, तर तुमच्या बिलात किती भर पडेल? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या कुलरचे 'वॉट' माहीत असणे गरजेचे आहे.

कुलर किती वीज वापरतो?

कुलरचा वीज वापर त्याच्या क्षमतेवर अवलंबून असतो. साधारणपणे घरगुती कुलर १०० वॉट ते २५० वॉटपर्यंत असतात. छोटे कुलर कमी वीज खातात, तर मोठे डेझर्ट कुलर जास्त वीज वापरतात.

समजा तुमचा कुलर १५० वॉटचा (150W)आहे. तो १ तास चालला तर ०.१५ युनिट वीज खर्च होते. जर, तुम्ही तो रोज ८ तास चालवला, तर दिवसाला १.२ युनिट वीज खर्च होईल. अशा प्रकारे ३० दिवसांचा विचार केल्यास महिन्याला ३६ युनिट वीज खर्च होईल.

खर्च किती येईल?

जर तुमच्या भागात विजेचा दर ६ रुपये प्रति युनिट असेल, तर ३६ युनिट × ६ रुपये = २१६ रुपये प्रति महिना. म्हणजेच, केवळ २०० ते २५० रुपयांत तुम्ही महिनाभर कुलरचा गारवा घेऊ शकता. एसीच्या तुलनेत हा खर्च अत्यंत नगण्य आहे.

वॉटनुसार महिन्याचा अंदाजे खर्च (दिवसाला ८ तास वापर):

१०० वॉटचा कुलर: २४ युनिट (महिना खर्च: अंदाजे १४४ रुपये)

२०० वॉटचा कुलर: ४८ युनिट (महिना खर्च: अंदाजे २८८ रुपये)

२५० वॉटचा कुलर: ६० युनिट (महिना खर्च: अंदाजे ३६० रुपये)

वीज बिल वाचवण्यासाठी खास टिप्स

१. व्हेंटिलेशन: कुलर नेहमी खिडकीत किंवा जिथे हवा खेळती असेल तिथे ठेवा, जेणेकरून कुलरला थंड हवा ओढणे सोपे जाईल आणि मोटरवर ताण येणार नाही.
२. पाणी आणि स्वच्छता: कुलरमधील पाण्याचा पंप वेळोवेळी स्वच्छ करा आणि पॅड्स (गवताचा भाग) ओले राहतील याची काळजी घ्या.
३. गरज नसल्यास बंद ठेवा: कुलरचा वापर झाल्यावर तो पूर्णपणे बंद करा. केवळ पंखा चालवूनही काही वेळ गारवा टिकवता येतो.
४. नवीन मॉडेल्स: जुन्या कुलरपेक्षा नवीन एनर्जी-एफिशिएंट कुलर वापरा, जे कमी विजेत जास्त हवा देतात.

Web Title : कूलर बिजली का खर्च: वाट के अनुसार अपने मासिक बिल की गणना करें!

Web Summary : कूलर को रोजाना 8 घंटे चलाने पर वाट के अनुसार मासिक बिजली बिल की गणना करें। ऊर्जा बचाने के सुझाव शामिल हैं। इस गर्मी में पैसे बचाएं!

Web Title : Cooler electricity cost: Calculate your monthly bill based on wattage!

Web Summary : Running a cooler 8 hours daily? Calculate your monthly electricity bill based on wattage. Energy-saving tips included. Save money this summer!