भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 12:18 IST2026-05-04T12:12:06+5:302026-05-04T12:18:02+5:30

West Bengal Assembly Election 2026 Result: पश्चिम बंगालमध्ये भाजपाला ऐतिहासिक मिळणार हे स्पष्ट झाल्यानंतर भाजपाचे नेते आणि मुख्यमंत्रि‍पदाचे दावेदार शुभेंदू अधिकारी यांनी एक मोठं विधान केलं आहे.

West Bengal Assembly Election 2026 Result: As soon as BJP's victory was confirmed, Shubhendu Adhikari made a big statement, revealing the secret of victory and saying.... | भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....

भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत यावेळी भाजपा ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर आहे. आज सकाळपासून सुरू असलेल्या मतमोजणीला चार तास उलटत असताना भाजपाने २९३ जागांपैकी १७३ जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता भाजपाला बहुमत मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाला ऐतिहासिक मिळणार हे स्पष्ट झाल्यानंतर भाजपाचे नेते आणि मुख्यमंत्रि‍पदाचे दावेदार शुभेंदू अधिकारी यांनी एक मोठं विधान केलं आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बंगालमध्ये हिंदूंवर अत्याचार केला. आता हिंदूंनी ममता बॅनर्जींना धडा शिकवला, असे शुभेंदू अधिकारी यांनी म्हटलं आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाजपाला विजय मिळणार हे जवळपास निश्चित झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शुभेंदू अधिकारी म्हणाले की, ममता बॅनर्जी यांच्या सरकारने बंगालमध्ये हिंदूंवर अत्याचार केला. आता हिंदूंनी ममता बॅनर्जींना धडा शिकवला. बंगालमध्ये अँटी इ्न्कम्बन्सी हा दुसरा फॅक्टर राहिला आहे. तर यांनी मालदा, मुर्शिदाबादपासून इतर ठिकाणी यांनी हिंदूंवर जो अत्याचार केला. त्यामुळेच हिंदूंनी ममता यांना मतदारांनी पूर्णपणे नष्ट केलं आहे, असे शुभेंदू अधिकारी यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये यावेळची निवडणूक बऱ्यापैकी हिंदू विरुद्ध मुस्लिम अशीच होताना दिसली होती. तसेच ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून सुरू असलेलं लांगुलचालनाचं राजकारण आणि राज्यात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांच्या मुद्यावरून भाजपाने आक्रमक भूमिका घेतील होती. त्यामुळे बंगालमध्ये हिंदू मतांची एकजूट होताना दिसली होती. तसेच याचाच फटका आज मतमोजणीमध्ये तृणमूल काँग्रेसला बसताना दिसला आहे.

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंतच्या कलांमध्ये भाजपाने १७३ जागांवर आघाडी घेतली आहे. तर तृणमूल काँग्रेस ८७ आणि इतर ३ जागांवर आघाडीवर आहेत. 
 

Web Title : शुभेंदु अधिकारी ने पश्चिम बंगाल में भाजपा की जीत का राज खोला

Web Summary : भाजपा पश्चिम बंगाल में आगे। शुभेंदु अधिकारी का दावा है कि हिंदुओं ने ममता बनर्जी को कथित उत्पीड़न के कारण सबक सिखाया। भाजपा के प्रदर्शन में हिंदू एकता और सत्ता विरोधी लहर ने भूमिका निभाई।

Web Title : Suvendu Adhikari Reveals BJP's Victory Secret in West Bengal Elections

Web Summary : BJP leads in West Bengal. Suvendu Adhikari claims Hindus taught Mamata Banerjee a lesson due to alleged oppression. Anti-incumbency and Hindu unity played key roles in BJP's strong performance, impacting Trinamool Congress.