अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 11:49 IST2026-05-04T11:48:28+5:302026-05-04T11:49:35+5:30

Angaraki Sankashti Chaturthi 2026: संकष्ट चतुर्थीचे महत्त्व असतेच पण अंगारक योग दुर्मिळ असतो, यासाठीच ५ मे रोजी अंगारकीला इच्छापूर्तीसाठी दिलेला उपाय करा. 

Angaraki Sankashti Chaturthi 2026: Fill the wish-fulfilling urn with 'Asa' on May 5th; Bappa will remove all obstacles! | अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!

अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!

अंगारकी चतुर्थीला गणपती बाप्पाची उपासना केल्याने जीवनातील संकटे दूर होतात. या दिवशी आपल्या मनातील इच्छा बाप्पापर्यंत पोहोचवण्यासाठी 'कलश भरण्याचा' हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो. जर तुम्हाला नोकरी, व्यवसाय किंवा वैयक्तिक जीवनात काही अडथळे येत असतील, तर ५ मे रोजी अंगारक संकष्ट चतुर्थीच्या(Angarak Sankashti Chaturthi 2026) मुहूर्तावर हा विधी नक्की करा.

हे ही वाचा : अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा

अंगारकी संकष्ट चतुर्थी ही आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आणि शुभ मानली जाते. जेव्हा संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते, तेव्हा त्याला 'अंगारकी' असे संबोधले जाते. या दिवशी केलेल्या उपवासाचे महत्त्व अनन्यसाधारण असून, असे मानले जाते की केवळ एका अंगारकीचा विधीवत उपवास केल्याने भाविकांना वर्षभरातील २१ संकष्टी चतुर्थींच्या उपवासाचे पुण्य प्राप्त होते. हा दिवस गणपती बाप्पा आणि मंगळ ग्रहाशी संबंधित असल्याने, या दिवशी केलेली आराधना कुंडलीतील मंगळ दोष दूर करण्यासाठी, कर्जमुक्तीसाठी आणि कामातील सर्व विघ्ने दूर करण्यासाठी अत्यंत फलदायी ठरते. रात्री चंद्रोदयाच्या वेळी चंद्राचे दर्शन घेऊन आणि त्याला अर्घ्य अर्पण करून हा उपवास सोडला जातो, ज्यामुळे मनाला शांती आणि जीवनात समृद्धी लाभते.

५ मे २०२६ रोजी येणारी अंगारक संकष्ट चतुर्थी ही विशेष फलदायी आहे. या शुभ मुहूर्तावर 'इच्छापूर्ती कलश' भरल्यास गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते. या उपायाची सविस्तर विधी आणि त्याचे लाभ खालीलप्रमाणे आहेत:

हा उपाय करण्यासाठी आपल्याला तांब्या किंवा पितळेचा कलश, अक्षता, सुपारी, नाणे, हळद-कुंकू, फुले आणि २१ दुर्वांची जोडी लागेल.

१. संकल्पाची पद्धत:

सर्वात आधी उजव्या हातात थोडे पाणी घ्या. डाव्या हाताने पाणी, अक्षता, हळद, कुंकू आणि फुलं हातात घेऊन मनात बाप्पाचे स्मरण करा. तुमच्या मनातील इच्छा किंवा संकल्प बाप्पाला सांगा आणि ते पाणी ताम्हनात सोडून द्या.

२. कलश भरणे:

आता तो कलश घ्या. त्यात शुद्ध पाणी भरा. त्या पाण्यात १ सुपारी, १ नाणे, थोडे हळद-कुंकू, फुलं आणि अक्षता टाकाव्यात. कलशाच्या मानेभोवती मंगलमयी 'रक्षासूत्र' (लाल धागा) बांधावे.

हे ही वाचा : Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!

३. स्वस्तिक आणि मंत्रजप:

'ओम गं गणपतये नमः' या मंत्राचा मनोभावे जप करत कलशावर कुंकवाने 'स्वस्तिक' काढावे. त्यावर हळद-कुंकू वाहून कलशाचे पूजन करावे.

४. दुर्वा अर्पण करणे:

कलशात २१ दुर्वांची जोडी (ज्याला हळद-कुंकू लावलेले असेल) अर्पण करावी. हा कलश बाप्पाच्या मूर्तीसमोर किंवा देवघरात सुरक्षित जागी ठेवावा.

५. दुसऱ्या दिवशीची प्रक्रिया (विसर्जन):

दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यावर कलशातील दुर्वांसह ते पाणी वाहत्या पाण्यात सोडून द्यावे. जर वाहते पाणी जवळ उपलब्ध नसेल, तर त्या दुर्वा निर्माल्यात टाकाव्यात आणि कलशातील पाणी घरातील तुळशीच्या किंवा अन्य फुलांच्या कुंडीत अर्पण करावे.

हे ही वाचा : Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!

या उपायाचे लाभ (Benefits)

इच्छापूर्ती: श्रद्धेने हा कलश भरल्यास प्रलंबित असलेली कामे मार्गी लागतात.

नकारात्मकता दूर होते: कलशात वापरलेले पाणी आणि मंत्रजप घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करतात.

आर्थिक स्थैर्य: कलशातील नाणे आणि सुपारी ही समृद्धीचे प्रतीक असून यामुळे आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते.

मंगळ दोषावर उपाय: अंगारकीच्या दिवशी हा उपाय केल्याने मंगळ ग्रहाचे प्रतिकूल परिणाम कमी होतात.

Web Title : अंगारक संकष्टी चतुर्थी 2026: 5 मई को कलश भरकर पूरी करें मनोकामना!

Web Summary : अंगारक संकष्टी चतुर्थी पर कलश भरकर भक्त अपनी मनोकामनाएं पूरी कर सकते हैं। माना जाता है कि यह अनुष्ठान करियर, व्यवसाय और निजी जीवन में बाधाओं को दूर करता है। 5 मई को यह अनुष्ठान करने से भगवान गणेश की कृपा से समृद्धि और शांति मिलती है।

Web Title : Angarak Sankashti Chaturthi 2026: Fulfill Wishes with Kalash on May 5th!

Web Summary : On Angarak Sankashti Chaturthi, devotees can fulfill wishes by filling a Kalash. This ritual is believed to remove obstacles in career, business, and personal life. Performing this ritual on May 5th can bring prosperity and peace by appeasing Lord Ganesha.