पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 11:34 IST2026-05-04T11:34:06+5:302026-05-04T11:34:55+5:30

West Bengal Assembly Election 2026 Result: देशभरात गाजलेल्या आरजी कर बलात्कार प्रकरणातील पीडितेची आई निवडणूक लढवत असलेल्या पनिहाटी विधानसभा मतदारसंघातही सुरुवातीच्या कलांमध्ये धक्कादायक निकाल लागताना दिसत आहेत.

West Bengal Assembly Election 2026 Result: Trinamool Congress suffers setback in Panihati constituency, RGK rape victim's mother in the lead | पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर

पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पहिल्या साडेतीन तासांच्या कलांमधून राज्यात सत्तांतराचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये प्रस्थापितांना धक्का बसताना दिसत आहे. त्यातच देशभरात गाजलेल्या आरजी कर बलात्कार प्रकरणातील पीडितेची आई निवडणूक लढवत असलेल्या पनिहाटी विधानसभा मतदारसंघातही सुरुवातीच्या कलांमध्ये धक्कादायक निकाल लागताना दिसत आहेत. येथून आरजीकर बलात्कार प्रकरणातील पीडितेची आई आणि भाजपा उमेदवार रत्ना देबनाथ यांनी आघाडी घेतली आहे. रत्ना देबनाथ यांनी सुरुवातीच्या मतमोजणीमध्ये तृणमूल काँग्रेसचे उमेदवार तीर्थांकर यांच्यावर सुमारे ३ हजार मतांची आघाडी घेतली आहे.

आरजीकर बलात्कार प्रकरणातील पीडितेची आई रत्ना देबनाथ ह्या निवडणूक लढवत असल्याने पनिहाटी मतदारसंघ चर्चेत आला होता. तसेच येथील लढत ही राजकीय न राहता भावनिक मुद्द्यांकडे वळली होती. बलात्कार पीडितेची आई असल्याने रत्ना देबनाथ यांना मोठ्या प्रमाणात सहानुभूती मिळत असल्याचे प्रचारादरम्यान, दिसून येत होते. दरम्यान, त्याचेच प्रतिबिंब आजच्या मतमोजणीच्या कलांमध्येही दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे सुरुवातीला पिछाडीवर पडले असले तरी तृणमूल कांग्रेसला आपलं भक्कम पक्ष संघटन आणि स्थानिक नेटवर्कमुळे विजयाची आशा आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार पश्चिम बंगालमधून आतापर्यंत समोर आलेल्या २२३ जागांच्या कलांमध्ये भाजपाने १४४ जागांवर आघाडी मिळवली आहे. तर तृणमूल काँग्रेसला केवळ ७६ जागांवर आघाडी मिळाली आहे. तर इतरांना ३ जागांवर आघाडी मिळाली असून, देशातील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसला राज्यात अद्याप एकाही जागेवर आघाडी मिळवला आलेली नाही. 
 

Web Title : पानीहाटी में टीएमसी को झटका: बलात्कार पीड़िता की माँ आगे।

Web Summary : पानीहाटी में टीएमसी को शुरुआती रुझानों में झटका। आरजी कर बलात्कार पीड़िता की मां, भाजपा उम्मीदवार रत्ना देबनाथ, 3000 वोटों से आगे। उनकी उम्मीदवारी के कारण चुनाव भावनात्मक हो गया।

Web Title : Setback for TMC in Panihati: Rape victim's mother leads.

Web Summary : Early trends show a setback for TMC in Panihati. The mother of an RG Kar rape victim, BJP candidate Ratna Debnath, leads by 3000 votes. The election gained emotional weight due to her candidacy.