तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 09:56 IST2026-05-04T09:54:35+5:302026-05-04T09:56:20+5:30

Tamilnadu Assembly Election Result: आज सुरू असलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या कलांमध्ये सर्वात धक्कादायक कल हे दक्षिणेतील तामिळनाडूमधून समोर येत आहेत.

Tamilnadu Assembly Election Result: A shock to the established parties in Tamil Nadu? Actor Vijay's TVK's strong push, it gained a lead in so many seats in the beginning | तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी

तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी

आज सुरू असलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या कलांमध्ये सर्वात धक्कादायक कल हे दक्षिणेतील तामिळनाडूमधून समोर येत आहेत. येथे सत्ताधारी द्रमुक आणि मुख्य विरोधी पक्ष असलेला अण्णा द्रमुक या प्रस्थापित पक्षांच्या आघाड्यांना जबरदस्त धक्का बसताना दिसत आहे. मतमोजणीच्या पहिल्या दीड तासांमध्ये २३४ जागांपैकी १९९ जागांचे कल समोर आले असून, त्यात अभिनेता विजय याचा टीव्हीके पक्ष जोरदार मुसंडीत मारताना दिसत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून तामिळनाडूमधील राजकारण हे द्रमुक आणि अण्णा द्रमुक या दोन प्रमुख पक्षांभोवती फिरत आलं आहे. मात्र यावेळी अभिनेता विजय याने टीव्हीके पक्षाच्या माध्यमातून राज्यातील जनतेसमोर तिसरा पर्याय ठेवला होता. तसेच विजय याला राज्यातील मतदारांकडूनही जोरदार प्रतिसाद मिळत होता. त्याचंच प्रतिबिंब यावेळच्या निवडणुकीच्या निकालांमध्ये दिसून आलं आहे. आतापर्यंत राज्यातील २३४ जागांपैकी २१९ जागांचे कल हाती आले असून, त्यात विजय याच्या पक्षाने १०० जागांवर आघाडी घेतली आहे. अण्णा द्रमुकच्या आघाडीने ६५ जागांवर आघाडी घेतली आहे. तर सत्ताधारी द्रमुक पक्षाची जबर पीछेहाट झाली असून, द्रमुकची आघाडी केवळ ५२ जागांवर आघाडीवर आहे.

दरम्यान, २३४ जागा असलेल्या तामिळनाडूच्या विधानसभेमध्ये बहुमतासाठी ११८ जागांची आवश्यकता आहे. मात्र सध्याचे कल पाहता तामिळनाडूमध्ये तिरंगी लढत दिसत असून, कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे तामिळनाडूत त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. 
 

Web Title : तमिलनाडु में उलटफेर? अभिनेता विजय की टीवीके की मजबूत बढ़त।

Web Summary : तमिलनाडु में राजनीतिक उथल-पुथल! अभिनेता विजय की टीवीके की मजबूत एंट्री, 100 सीटों पर आगे, स्थापित द्रविड़ पार्टियों को चुनौती। त्रिशंकु विधानसभा की संभावना।

Web Title : Tamil Nadu election upset? Actor Vijay's TVK leads strongly.

Web Summary : Tamil Nadu witnesses a political shakeup! Actor Vijay's TVK makes a strong entry, leading in 100 seats, challenging established Dravidian parties. A hung assembly looms.