Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट

Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट

Stock Market Today: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात चढउतार दिसून येत होते. परंतु आज शेअर बाजाराच्या कामकाजाची सुरुवात तेजीसह झाली. सोमवारी बीएसई सेन्सेक्स ३४.७७ अंकांच्या तेजीसह ७७,२५७.२७ अंकांवर खुला झाला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 10:01 IST2026-05-04T10:01:36+5:302026-05-04T10:01:36+5:30

Stock Market Today: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात चढउतार दिसून येत होते. परंतु आज शेअर बाजाराच्या कामकाजाची सुरुवात तेजीसह झाली. सोमवारी बीएसई सेन्सेक्स ३४.७७ अंकांच्या तेजीसह ७७,२५७.२७ अंकांवर खुला झाला.

Stock Market Today 4 may 2026 Stock market starts with a bullish start Sensex up 344 points, Nifty up 66 points these stocks huge rally amid West Bengal result | Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट

Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट

Stock Market Today: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात चढउतार दिसून येत होते. परंतु आज शेअर बाजाराच्या कामकाजाची सुरुवात तेजीसह झाली. सोमवारी बीएसई सेन्सेक्स ३४.७७ अंकांच्या तेजीसह ७७,२५७.२७ अंकांवर खुला झाला. तर एनएसई निफ्टी ६६ अंकांच्या तेजीसह  २४,०६३ वर व्यवहार करत होता. देशात निरनिराळ्या राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांच्या सुरुवातीचे कल आणि जागतिक बाजारातील संकेतांचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. विशेष म्हणजे पश्चिम बंगालमधील सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला मिळणारी आघाडीदेखील सकारात्मक परिणाम करत असल्याचं म्हटलं जातंय.

मारुती सुझुकीच्या शेअरची बंपर सुरुवात

सोमवारी सेन्सेक्सच्या ३० पैकी २८ कंपन्यांचे शेअर्स ग्रीन झोनमध्ये खुले झाले. तर २ कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. तर निफ्टीच्या ५० पैकी ४४ कंपन्यांचे शेअर्स तेजीसह खुले झाले आणि अन्य ६ कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते. सेन्सेक्समध्ये असलेल्या मारुती सुझुकीच्या शेअरमध्ये आज सर्वाधिक ४.३० टक्क्यांची तेजी दिसून आली. तर दुसरीकडे कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्समध्ये सर्वाधिक ३.८८ टक्क्यांची घसरण झाली. याशिवाय भारती एअरटेलच्या शेअरनंही घसरणीसह कामकाजाला सुरुवात केली.

Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'

कोणत्या शेअर्समध्ये तेजी?

कामकाजादरम्यान अदानी पोर्ट्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, इंडिगो, एशियन पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट, एल अँड टी, सन फार्मा, एचडीएफसी, टाटा स्टील, टेक महिंद्रा, एचसीएल टेक या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. तर रिलायन्स इंडस्ट्रिज, अॅक्सिस बँक, इन्फोसिस, बजाज फायनान्स. एनटीपीसी, टायटन, एसबीआय या कंपन्याच्या शेअर्सनंदेखील तेजीसह कामकाजाला सुरुवात केली.

Web Title : शेयर बाजार में तेजी: सेंसेक्स ऊपर, निफ्टी में वृद्धि; शीर्ष लाभ

Web Summary : हालिया उतार-चढ़ाव के बाद शेयर बाजार सकारात्मक रूप से खुला। चुनाव के रुझानों और वैश्विक संकेतों से प्रभावित सेंसेक्स और निफ्टी दोनों में लाभ हुआ। मारुति सुजुकी के शेयरों में तेजी आई, जबकि कोटक महिंद्रा बैंक में गिरावट आई। अदानी पोर्ट्स और हिंदुस्तान यूनिलीवर को भी लाभ हुआ।

Web Title : Stock Market Opens Strong: Sensex Up, Nifty Rises; Top Gainers

Web Summary : The stock market started positively after recent fluctuations. Sensex and Nifty both saw gains, influenced by election trends and global cues. Maruti Suzuki shares led the surge, while Kotak Mahindra Bank faced a decline. Adani Ports and Hindustan Unilever also experienced gains.