lokmat Supervote 2024
Lokmat Money > Gold Silver Rates

कोणत्याही वस्तूची किंमत 'मागणी व पुरवठा' या अर्थशास्त्रीय नियमानुसार ठरते.मागणी वाढल्यास किंमत वधारते व मागणी घटल्यास किंमत आपोआप घसरते. हाच नियम सोन्या-चांदीसाठीही लागू होतो.जेव्हा जेव्हा जागतिक शेअर बाजारातील स्थिती अनिश्चित व प्रतिकूल स्वरूपाची दिसू लागते,तेव्हा परकीय गुंतवणूकदार शेअर बाजारातील गुंतवणूक काढून घेतात व त्याला पर्यायी मार्ग शोधतात. त्यापैकी एक पर्यायी,पारंपरिक व अधिक सुरक्षित मार्ग म्हणजे सोने-चांदीची खरेदी किंवा त्यामधील गुंतवणूक.

 

यामुळे सोन्याची मागणी वाढते. म्हणजे त्याचे उत्पादन, त्यावरील प्रक्रिया खर्च,आयात-निर्यात खर्च व इतर तत्सम शुल्क यांमुळे सोन्यालाझळाळी मिळते. जर मात्र शेअर बाजार किंवा इतर जागतिक गुंतवणूक माध्यमे सुरळीत झाली, त्यांच्यावरील अनिश्चितता व चिंतेचे सावट दूर झाले,की पुन्हा गुंतवणूकदार शेअर बाजाराकडे वळवतात. त्यामुळे जागतिक बाजारातील सोन्या-चांदीची मागणी कमी होऊन त्यांची किंमतही घसरते.