lokmat Supervote 2024
Lokmat Money > LPG Price

भारतात एलपीजी सिलिंडरची किंमत प्रामुख्याने 'इम्पोर्ट पॅरिटी प्राइस' किंवा आयपीपी या सूत्रानुसार ठरवली जाते. हा IPP आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या LPG च्या किमतीनुसार ठरवला जातो. भारतातील बहुतांश गॅस पुरवठा हा आयातीवर अवलंबून आहे. भारतातला IPP चा बेंचमार्क सौदी अरामकोची LPG किंमत असते. दरम्यान, सौदी अरामको या जगातल्या सर्वांत मोठ्या तेल कंपनीच्या एलपीजी किमतीच्या आधारे देशांतर्गत बाजारातले एलपीजीचे दर ठरवले जातात. 

याशिवाय फ्री ऑन बोट (Free On Board), समुद्रमार्गे होणारं शिपिंग, विमा, कस्टम ड्युटी यावरूनदेखील किंमती ठरवल्या जातात. यांच्या किंमती डॉलर्समध्ये सांगितल्या जातात. त्यानंतर त्या रुपयांमध्ये कन्व्हर्ट केल्या जातात. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्यानं पूर्वीच्या तुलनेत एलपीजीचे दरही वाढले आहेत. याशिवाय गॅस सिलिंडरची देशांतर्गत वाहतूक, मार्केटिंगचा खर्च, तेल कंपन्यांचं मार्जिन, बॉटलिंग चार्जेस, डीलर्सचं कमिशन आणि जीएसटी हे सगळं मिळून सिलिंडरची किंमत ठरवली जाते.

दरम्यान, भारतात एलपीजी सिलिंडरच्या किंमतीसाठी मनी एक्सचेंज रेट आणि इंटरनॅशनल बेंचमार्क रेट हे दोन घटक प्रामुख्यानं जबाबदार असतात.