lokmat Supervote 2024
Lokmat Money > Post Office Saving Scheme

सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिसच्या बचत योजना या सर्वात पसंतीची योजना आहेत. अशा पोस्ट ऑफिस स्कीममध्ये गुंतवणूक केली तर उत्तम परतावाही मिळतो. या माध्यमातून तुम्ही दरमहा उत्तम कमाई करू शकता. पोस्ट ऑफिस मंथली सेव्हिंग स्कीम ही एक सरकारी बचत योजना आहे, ज्यामध्ये तुम्हाला दरमहा व्याज मिळते. डिपार्टमेंट ऑफ पोस्ट किंवा इंडिया पोस्ट ही योजना चालवतात. सध्या या योजनेअंतर्गत तुम्हाला वार्षिक ७.४ टक्के दराने व्याज मिळते. यामध्ये सरकार सातत्यानं बदल करत असते.

POMIS मध्ये कसा मिळतो रिटर्न
या योजनेत, तुम्हाला एक निश्चित रक्कम एकदाच जमा करावी लागेल आणि त्यातून तुम्हाला दर महिन्याला व्याजाच्या स्वरूपात कमाई होत राहते. ही स्कीम ५ वर्षांत मॅच्युअर होते, त्यानंतर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतात. म्हणजेच, एकदा पैसे गुंतवून, तुम्हाला पुढील पाच वर्षांसाठी दर महिन्याला एक निश्चित रक्कम मिळते आणि नंतर योजनेच्या मुदतीनंतर, तुम्हाला तुमचे संपूर्ण पैसे परत मिळतात. मुदतपूर्तीनंतर, तुम्ही योजनेमध्येच संपूर्ण निधी पुन्हा गुंतवू शकता. जर मॅच्युरिटीवर योजनेतून पैसे काढले किंवा पुन्हा गुंतवले गेले नाहीत, तर तुम्हाला पोस्ट ऑफिस बचत खात्याच्या व्याज दरानुसार संपूर्ण रकमेवर व्याज मिळत राहतं.

टॅक्सचा नियम काय
पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीममध्ये तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर TDS (tax deducted at source) कापला जात नाही, परंतु तुमच्या हातात मिळणारे व्याज करपात्र आहे.