अनेकदा लोक इतर कोणतंही लोन घेण्याऐवजी पर्सनल लोनकडे वळतात. कारण पर्सनल लोन मिळवणं इतर लोनच्या तुलनेनं सोपं असतं. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पर्सनल लोन हे एक अनसिक्युअर्ड लोन आहे. यामध्ये काही गहाण ठेवण्याची गरज नसते. तुम्ही या कर्जाची परतफेड १ ते ५ वर्षांमध्ये करू शकता.
मेडिकल इमर्जन्सी, शिक्षणाचा खर्च, फिरण्यासाठीचा खर्च किंवा लग्न कार्यासाठी तुम्ही हे कर्ज घेऊ शकता. पर्सनल लोनचे व्याजदर हे बँकांनुसार निरनिराळे असू शकतात. यामध्येही क्रेडिट स्कोअर आणि कर्जाची रक्कम महत्त्वाची भूमिका बजावतात. जर तुम्ही अटींची पूर्तता करत असाल तर तुम्ही बँका किंवा एनबीएफकडून पर्सनल लोन घेण्यास पात्र ठरता. तुम्ही कोणत्याही बँकेत जाऊन यासाठी अर्ज करू शकता.
ऑनलाइन पद्धतीनं किंवा तुम्ही तुमच्या बँकेच्या अॅप मार्फत या लोनसाठी अर्ज करू शकता. यामध्ये प्रोसेसिंग फी, प्री आणि पार्ट पेमेंट, व्हेरिफिकेशन फी, लीगल चार्जेस अशा प्रकारचे शुल्क आकारले जाऊ शकते. पर्सनल लोन घेताना बँका तुमचं वय, क्रेडिट स्कोअर, पगार, एकूण मिळत, नोकरीचा प्रकार किंवा व्यवसाय असे निकष पडताळून पाहते.