भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
By आप्पासाहेब पाटील | Updated: May 4, 2026 15:11 IST2026-05-04T15:10:13+5:302026-05-04T15:11:17+5:30
Solapur Akkalkot Highway Accident: सोलापूरमधील रूद्देवाडीजवळ एसटी बस आणि डंपरचा भीषण अपघात. डंपरने पेट घेतला असून दोन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. वाचा सविस्तर माहिती.

भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
- आप्पासाहेब पाटील
सोलापूर : सोलापूर-अक्कलकोट महामार्गावरील रूद्देवाडी बसस्थानकाजवळ एसटी बस व मुरूमाने भरलेल्या डंपरचा भीषण अपघात झाला. हा अपघात सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडला आहे. अपघातानंतर डंपरने पेट घेतल्याने दोन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, याबाबत पोलिसांनी सांगितले की, अक्कलकोट होऊन गाणगापूर कडे जाणाऱ्या बसला रुद्देवाडी बसस्थानकाजवळ मुरूमाने भरलेल्या डंपरने समोरून धडक दिली. या धडकेत एसटी बसचे प्रचंड नुकसान झाले आहे. अपघातानंतर पुढे जाऊन डंपर उलटला आणि डंपरने पेट घेतला. बसमधील अनेक प्रवासी किरकोळ तर काही प्रवास गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. अपघातानंतर मदतीसाठी ग्रामस्थ धावले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात येत आहे.