Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 19:57 IST2026-05-04T19:56:12+5:302026-05-04T19:57:33+5:30

बंगालच्या पश्चिम बर्धमानमध्ये भाजपाच्या विजयानंतर एक कार्यकर्ता प्रचंड भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

west bengal election bjp worker asansol crying winning barabani west bardhaman | Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला

Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला

पश्चिम बंगालमधील २९३ जागांवर मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंतच्या कलानुसार, भाजपाने २०४ जागांवर आघाडी घेतली आहे, तर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला केवळ ८४ जागांवर आघाडी मिळवता आली आहे. दुसरीकडे काँग्रेस केवळ दोन जागांवर पुढे आहे. याच दरम्यान बंगालच्या पश्चिम बर्धमानमध्ये भाजपाच्या विजयानंतर एक कार्यकर्ता प्रचंड भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

पश्चिम बर्धमान जिल्ह्यातील 'बारबानी' मतदारसंघात भाजपाचा विजय झाल्यानंतर पक्षाच्या एका कार्यकर्त्याला आपले अश्रू अनावर झाले आणि तो आनंदाने ढसाढसा रडू लागला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.  सुजॉय गोराई असं या भाजपा कार्यकर्त्याचं नाव असून त्याने "प्रत्येक निवडणुकीनंतर आम्हाला १५ दिवस बाहेर राहायला लागत होतं, पण आता असं होणार नाही" असं म्हटलं आहे. 

भावुक होऊन भाजपा कार्यकर्ता म्हणाला की, "प्रत्येक निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) कार्यकर्ते आम्हाला मारहाण करायचे. आम्ही गेली १५ वर्षे सतत मार खात आलो आहोत." निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, भाजपा २०० हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. तर २०११ पासून बंगालमध्ये सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला हवं तसं यश मिळालेलं नाही.

Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद

बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. २०२१ च्या निवडणुकीतही भाजपाची कामगिरी चांगली होती, पण त्यांना बहुमताचा आकडा गाठता आला नव्हता. गेल्या निवडणुकीत भाजपाने ७७ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी भाजपाची मतदानाची टक्केवारी ३८ टक्के होती, मात्र यावेळी ही टक्केवारी वाढली आहे. 

Web Title : पश्चिम बंगाल: जीत के बाद बीजेपी कार्यकर्ता रोए, 15 साल की कठिनाई याद आई।

Web Summary : पश्चिम बंगाल में भाजपा की जीत के बाद, बर्धमान में एक पार्टी कार्यकर्ता ने टीएमसी द्वारा चुनाव के बाद 15 वर्षों तक हुई हिंसा को याद करते हुए भावुक होकर अपनी बात रखी। उन्होंने 2021 से भाजपा के बेहतर प्रदर्शन पर राहत व्यक्त की।

Web Title : West Bengal: BJP worker cries after victory, recalls 15 years hardship.

Web Summary : Following BJP's West Bengal victory, a party worker in Bardhaman emotionally recounted enduring 15 years of post-election violence by TMC. He expressed relief, noting BJP's improved performance since 2021.