Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 19:04 IST2026-05-04T19:02:02+5:302026-05-04T19:04:40+5:30

Ravi Kishan : बंगालमधील भाजपाच्या या कामगिरीवर गोरखपूरचे भाजपा खासदार रवी किशन यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. रवी किशन यांनी 'एक्स'वर पोस्ट करत लिहिलं आहे की - "बंगालमध्ये नव्या युगाची सुरुवात... कमळाची साथ"

BJP mp Ravi Kishan today Bengal has free breathe freely on west bengal assembly election results 2026 | Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद

Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद

पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजपा प्रचंड विजय मिळवताना दिसत आहे. ज्या विजयाचं स्वप्न भाजपाने अनेक वर्षांपासून पाहिलं होतं, ते आज प्रत्यक्षात येताना दिसत आहे. बंगालमधील भाजपाच्या या कामगिरीवर गोरखपूरचे भाजपा खासदार रवी किशन यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. रवी किशन यांनी 'एक्स'वर पोस्ट करत लिहिलं आहे की - "बंगालमध्ये नव्या युगाची सुरुवात... कमळाची साथ"

बंगालमधील भाजपाच्या यशावर बोलताना रवी किशन म्हणाले की, "हे यश पंतप्रधान नरेंद्र मोदी, हिमंता बिस्वा सरमा यांचं कार्य आणि भाजपाच्या धोरणांमुळे मिळालं आहे. गरिबांचं कल्याण आणि मुलींच्या कल्याणामुळे भाजपाचा विजय होत आहे. बंगालमधील परिस्थिती अत्यंत आव्हानात्मक होती, तिथे जिंकणं खूप गरजेचं होतं. आज बंगाल खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला आहे, आज तो फक्त जिंकणार नाही तर मुक्त होईल आणि आता मोकळा श्वास घेईल."

"हिंदू स्वतंत्र होईल"

रवि किशन पुढे म्हणाले की, "आज तिथे मुलींना स्वातंत्र्य मिळेल, तिथला हिंदू स्वतंत्र होईल. आता तिथे प्रत्येकजण 'जय श्रीराम'चा नारा देऊ शकेल, दुर्गा पूजा आणि शोभायात्रा शांततेत साजरी करता येईल आणि लोक विकास पाहतील. या विजयाचे श्रेय पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या रणनीतीला, तसेच आरएसएस आणि भाजपाच्या त्या सर्व कार्यकर्त्यांना जातं ज्यांच्या घरात हत्या झाल्या, तरीही त्यांनी भाजपाचा झेंडा सोडला नाही. हा एका मोठ्या जिद्दीचा विजय आहे."

"हा विजय ऐतिहासिक"

रवी किशन यांनी म्हटलं की, "हा विजय ऐतिहासिक आहे. संपूर्ण बंगाली समाजाचा पंतप्रधान मोदींवर असलेला विश्वास, गृहमंत्री अमित शाह यांची रणनीती, केंद्रीय दल आणि बंगाली हिंदू तसेच प्रत्येक बंगाली नागरिकाची स्वतःला मुक्त करण्याची इच्छा यामुळे हे शक्य झालं आहे. लोकांना भीती, गुंडगिरी, बॉम्बची दहशत आणि हत्यांच्या छायेतून बाहेर पडायचं होतं."

"भारतीय विचारांचा विजय"

"बंगाल हा 'सोनार बांगला' म्हणून ओळखला जायचा, ती साहित्य आणि अध्यात्माची भूमी होती. आज बंगालने आपलं अस्तित्व आणि ओळख पुन्हा मिळवली आहे. बंगाल आता पुन्हा एकदा आपल्या आध्यात्मिक शक्तीसह प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल. हा संपूर्ण भारताचा आणि भारतीय विचारांचा विजय आहे. काही लोकांनी बंगालला भारतापासून वेगळं राज्य करून ठेवलं होतं, जिथे बांगलादेशी घुसखोरांनी दहशत माजवली होती, आता ती परिस्थिती बदलेल."
 

Web Title: BJP mp Ravi Kishan today Bengal has free breathe freely on west bengal assembly election results 2026