निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 19:35 IST2026-05-04T19:33:36+5:302026-05-04T19:35:31+5:30
West Bengal Assembly Election 2026 Result: पश्चिम बंगालमध्ये भाजपाला यश मिळत आहे, असे दिसताच पंतप्रधान मोदी यांना झालमुडी दिलेल्या विक्रेत्याने दिवसभर बंद ठेवलेले दुकान उघडले आणि प्रतिक्रियाही दिली.

निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
West Bengal Assembly Election 2026 Result: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. २९३ जागांपैकी एकूण २०४ जागांवर भाजपा आघाडीवर असून, ६६ जागी भाजपा उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष एकूण ५३ जागांवर आघाडीवर असून, ३० जागांवर तृणमूलचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर काँग्रेस पक्ष २ जागांवर आघाडीवर असून, एक जागा जिंकली आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारली असून, देशभरात विजयोत्सव साजरा केला जात आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या दुकानात झालमुडी घेतली होती, त्या विक्रेत्याची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांनी झालमुडीचा आस्वाद घेतला. पंतप्रधान मोदींचा झालमुडी विकत घेतानाचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. यानंतर देशभरात या घटनेची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती. भाजपाच्या पश्चिम बंगालमधील विजयाच्या निर्णायक मुद्द्यांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी झालमुडी विक्रेत्याच्या दुकानाला दिलेली भेट आणि आपलेपणाने साधलेला संवाद हाही एक मुद्दा मानला जात आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपाने विजयश्री खेचून आणताच त्या झालमुडी विक्रेत्याची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले
पश्चिम बंगालमधील झारग्राम येथे काही दिवसांपूर्वी एका रॅलीहून परतत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी येथील एका झालमुडी विक्रेत्याच्या दुकानात थांबले होते. त्यांनी या झालमुडीचा आस्वाद घेतला होता. निवडणुकीच्या निकालांबाबत असलेल्या अनिश्चिततेमुळे दुकानदार विक्रम कुमार साऊ यांनी दिवसभर आपले दुकान बंद ठेवले होते; मात्र भाजपच्या विजयानंतर सायंकाळी त्यांनी ते पुन्हा उघडले. या दुकानाबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. तसेच या दुकानासमोर भारत माता की जय, जय श्रीराम अशा घोषणाही दिल्या. भाजपाच्या यशाबाबत प्रतिक्रिया देताना दुकानदार विक्रम कुमार साऊ म्हणाला की, खूपच छान वाटले. केवळ माझे दुकानच प्रसिद्ध झाले नाही, तर 'झालमुरी'ला एक खाद्यपदार्थ म्हणून संपूर्ण भारतात ओळख मिळाली आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या भेटीनंतर विक्रम साह यांनी या अनुभवाबाबत सांगितले. पंतप्रधान मोदी यांना झालमुडी खूपच आवडली. त्यांनी माझे नाव विचारले आणि किती शिक्षण घेतले आहे, हेही विचारले. पंतप्रधान मोदी येथे १० मिनिटे थांबले होते. त्यांच्यासोबत लहान मुलेही होती. पंतप्रधान माझ्या दुकानात येतील, असे वाटले नव्हते. पुढे हसून विक्रम यांनी म्हटले होते की, एका गोष्टीची खंत आहे, ती म्हणजे, मी पंतप्रधानांची स्वाक्षरी घ्यायला विसरलो. हा क्षण मी आयुष्यभर लक्षात ठेवेल. देशाचे पंतप्रधान माझ्या छोट्याशा दुकानात आले याचा मला खूप आनंद झाला होता.
ঝাড়গ্রামে ঝালমুড়ি খাবার বিরতি! pic.twitter.com/t0TcDeONxt
— Narendra Modi (@narendramodi) April 19, 2026
Jhargram, West Bengal: Prime Minister Narendra Modi had stopped at a jhal muri stall in Jhargram and enjoyed the snack while returning from a rally a few days ago. Due to uncertainty over the election results, shopkeeper Vikram Kumar Sau had kept his shop closed throughout the… pic.twitter.com/NGBv2kIv0B
— IANS (@ians_india) May 4, 2026