'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 08:44 IST2026-05-06T08:41:36+5:302026-05-06T08:44:09+5:30

इराणसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून व्यापारी जहाजांसाठी सुरक्षित मार्ग पुन्हा प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने ट्रम्प प्रशासनाने 'प्रोजेक्ट फ्रीडम' ही लष्करी मोहीम सुरू केली होती.

'Project Freedom' closed, will no longer provide security to ships in Hormuz; Trump's big announcement | 'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा

'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा

US इराण यांच्यातील संघर्ष संपवण्यासाठी सुरू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात आहे. त्यातच होर्मुझ स्ट्रेटबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मध्य पूर्वेत व्यावसायिक जहाजांना सुरक्षा देण्यासाठी प्रोजेक्ट फ्रीडम या नौदल मोहिमेला स्थगिती देण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. परंतु इराणी बंदरावरील नाकेबंदी जारी राहील असंही अमेरिकेने स्पष्ट केले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मिडिया ट्रुथवर पोस्ट केले आहे की, इराणच्या प्रतिनिधींसोबत कराराबाबत चर्चा पुढे जात आहे. इराणसोबतचा करार अंतिम करण्यासाठीची ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ ही मोहीम काही काळासाठी थांबवण्यात आली आहे असं त्यांनी सांगितले. इराणविरुद्धच्या मोहिमेत मिळालेल्या लष्करी यशाचा हवाला देत तसेच शांतता करारासंदर्भात इराणी प्रतिनिधींसोबत झालेल्या योग्य वाटाघाटींच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तान आणि इतर देशांच्या विनंतीवरून आम्ही अंतिम करारापर्यंत प्रोजेक्ट फ्रीडम काही काळासाठी स्थगित केले आहे परंतु नाकेबंदी पूर्णपणे लागू राहील असं त्यांनी म्हटलं.

काय आहे ऑपरेशन 'प्रोजेक्ट फ्रीडम'?

इराणसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून व्यापारी जहाजांसाठी सुरक्षित मार्ग पुन्हा प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने ट्रम्प प्रशासनाने 'प्रोजेक्ट फ्रीडम' ही लष्करी मोहीम सुरू केली होती. या मोहिमेचा उद्देश सामुद्रधुनीतून आंतरराष्ट्रीय व्यापारी जहाजांचा सुरक्षित मार्ग सुनिश्चित करणे हा आहे. इराणने गेल्या काही आठवड्यांत जहाजांवर वारंवार हल्ले केले आहेत असा अमेरिकेचा आरोप आहे. होर्मुझची सामुद्रधुनी हा एक महत्त्वाचा मार्ग आहे, कारण जगातील जवळपास २० टक्के तेल याच मार्गाने जाते. त्यामुळे तिची सुरक्षा संपूर्ण जगासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.  अमेरिकेने या मोहिमेसाठी एक मोठी लष्करी शक्ती तैनात केली आहे. ज्यामध्ये १५,००० हून अधिक सैनिक, गाइडेड मिसाइल डेस्ट्रॉयर जहाजे, हेलिकॉप्टर आणि १०० हून अधिक विमानांचा समावेश आहे.

दरम्यान, अलीकडेच इराणने पाकिस्तानच्या माध्यमातून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे १४ कलमी शांतता प्रस्ताव धाडला आहे. इराणचा हा प्रस्ताव अमेरिकेने आधी दिलेल्या ९ कलमी योजनेला प्रत्युत्तर मानले जात आहे. इराणच्या प्रमुख मागण्यांमध्ये पुढील ३० दिवसांत सर्व वाद मिटवून युद्ध कायमस्वरूपी संपवणे, भविष्यात अमेरिकेने इराणवर हल्ला करू नये, याची लेखी हमी, इराणच्या सीमांजवळून अमेरिकन सैन्य मागे घेणे, जप्त केलेली इराणची संपत्ती परत करणे आणि निर्बंध उठवणे, युद्धाच्या नुकसानीची भरपाई आणि लेबनॉनसह सर्व आघाड्यांवरील युद्धबंदी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, युरेनियम संवर्धनाचा अधिकार अबाधित राखणे, या मागण्या आहेत.

Web Title : ट्रम्प ने 'प्रोजेक्ट फ्रीडम' रोका, अब खाड़ी जहाजों को सुरक्षा नहीं।

Web Summary : ईरान के साथ समझौते की बातचीत के बीच ट्रम्प ने खाड़ी जहाजों की सुरक्षा के लिए 'प्रोजेक्ट फ्रीडम' को निलंबित कर दिया। ईरानी बंदरगाहों की नाकेबंदी जारी रहेगी। ईरान ने शांति का प्रस्ताव दिया: संघर्ष खत्म, प्रतिबंध हटाओ, हमले की गारंटी नहीं, संपत्ति लौटाओ, युद्ध मुआवजा और यूरेनियम संवर्धन का अधिकार बरकरार।

Web Title : Trump halts 'Project Freedom,' no more Gulf ship protection.

Web Summary : Trump suspended 'Project Freedom,' securing Gulf ships, amid Iran deal talks. Iranian port blockade remains. Iran proposed peace: end conflict, lift sanctions, guarantee no attack, return assets, war compensation and retain uranium enrichment rights.