डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 09:14 IST2026-05-06T09:13:42+5:302026-05-06T09:14:16+5:30

कोर्टाने पाटील यांचे ज्येष्ठ वकील राजीव शकधर आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने बाजू मांडणारे महाधिवक्ता मिलिंद साठे यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर हा निर्णय दिला.

Sangram Patil Path to the UK Cleared: Mumbai High Court Grants Relief, Orders Modification of Look-Out Circular | डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?

डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले यूकेस्थित डॉक्टर  डॉक्टर आणि यूट्यूबर संग्राम पाटील यांना हायकोर्टाने दिलासा दिला आहे. पाटील यांच्या विरोधात जारी करण्यात आलेले 'लूक आऊट सर्क्युलर' (LOC) मध्ये तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने मंगळवारी महाराष्ट्र सरकारला दिले, जेणेकरून संग्राम पाटील यांना सोमवारपर्यंत आपल्या मायदेशी परतता येईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या इतर नेत्यांविरोधात बदनामीकारक पोस्ट केल्याच्या आरोपावरून पाटील यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. न्यायमूर्ती अश्विन भोबे  यांनी संग्राम पाटील आणि त्यांच्या पालकांनी दाखल केलेले प्रतिज्ञापत्र-कम-हमीपत्र रीतसर नोंदवून घेतले. या पत्रातून त्यांनी कोर्टाला हमी देत जेव्हा जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा ते भारतात परत येतील आणि तपास यंत्रणेला सहकार्य करतील असं सांगितले आहे. 

कोर्टाने पाटील यांचे ज्येष्ठ वकील राजीव शकधर आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने बाजू मांडणारे महाधिवक्ता मिलिंद साठे यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर न्यायाधीशांनी राज्य शासनाला सोमवारपर्यंत (११ मे) लूक आऊट सर्क्युलरमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून पाटील आपल्या मायदेशी परत जाऊ शकतील. या संदर्भातील अंतरिम याचिका निकाली काढण्यात आली असून एफआयआर (FIR) रद्द करण्याची मागणी करणारी मुख्य याचिका उन्हाळी सुट्ट्यांनंतर सुनावणीसाठी सूचीबद्ध करण्यात आली आहे. 

काय आहे प्रकरण?

लंडनमध्ये राहणारे अनिवासी भारतीय डॉक्टर संग्राम पाटील यांना मुंबई पोलिसांनी १० जानेवारीला विमानतळावरून ताब्यात घेतले होते. पहाटे लंडनहून मुंबईत आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली होती. मोदी सरकारच्या धोरणांविरोधात सातत्याने टीकात्मक लिखाण करत असल्याचा पाटील यांच्यावर आरोप आहे. संग्राम पाटील हे लंडनमध्ये राहतात. सातत्याने सत्य, निर्भीड आणि स्पष्ट भूमिका मांडण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांच्यावरील कारवाईनंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. त्यानंतर संग्राम पाटील यांच्याविरोधात लुक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आले. तेव्हापासून ते भारतात अडकून आहेत. 

Web Title : डॉ. संग्राम पाटिल को बॉम्बे हाईकोर्ट से राहत, यूके जाने का रास्ता खुला

Web Summary : बॉम्बे हाईकोर्ट ने महाराष्ट्र सरकार को डॉ. संग्राम पाटिल के खिलाफ 'लुक आउट सर्कुलर' में संशोधन करने का निर्देश दिया है। डॉ. पाटिल, यूके स्थित डॉक्टर और यूट्यूबर हैं, जिन पर पीएम मोदी के खिलाफ आपत्तिजनक पोस्ट करने का आरोप है। इससे पाटिल को सोमवार तक यूके लौटने की अनुमति मिल गई, बशर्ते वे जांच में सहयोग करें।

Web Title : Bombay High Court Relieves Dr. Sangram Patil, Clears Way to UK

Web Summary : The Bombay High Court has directed the Maharashtra government to amend the 'Look Out Circular' against Dr. Sangram Patil, a UK-based doctor and YouTuber, who was booked for objectionable posts against PM Modi. This allows Patil to return to the UK by Monday, provided he cooperates with the investigation.