Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 09:05 IST2026-05-06T09:01:57+5:302026-05-06T09:05:30+5:30
Palghar sexual abuse Crime : आजारी बहिणीसाठी औषध घ्यायला बोलावून एका ५५ वर्षीय भोंदूबाबाने १३ वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना पालघरमध्ये घडली. मुलीच्या कुटुंबीयांना याबद्दल कळल्यानंतर हा प्रकार समोर आला.

Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
मोठ्या बहिणीचा मासिक पाळीनंतरही रक्तस्त्राव थांबत नसल्याने कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी एका भोंदूबाबाला संपर्क केला. त्याने अघोरी पूजा करावी लागेल आणि गावठी औषध देतो म्हणून भेटायला बोलावले. कुटुंबीय पीडित मुलीसह भोंदूबाबाला भेटायला गेले आणि त्याच वेळी त्याने पीडितेला बाजूला नेऊन एका स्मशानभूमीजवळ बलात्कार केला.
पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपी भोंदूबाबाला अटक करण्यात आली.
पाळीचा रक्तस्राव आणि भोंदूबाबाने घेतलेला फायदा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोंदूबाबाच्या अत्याचाराला बळी पडलेल्या मुलीच्या मोठ्या बहिणीला मासिक पाळीसंदर्भात त्रास सुरू होता. मासिक पाळीनंतरही रक्तस्राव थांबत नसल्याने कुटुंबीयांनी चिंतेत होते.
कुटुंबीयांनी आणि तिच्या नातेवाईकांनी या भोंदूबाबाला कॉल केला. या बाबाने अघोरी पूजा करावी लागेल आणि आयुर्वेदिक औषधी देतो म्हणून ३ मे रोजी भेटायला बोलावले होते.
पीडित मुलीसह तिचे कुटुंबीय भोंदूबाबाकडे गेले. ४ मे रोजी मध्यरात्री १ वाजता चरी येथील एका स्मशानभूमीजवळ अघोरी पूजा करण्यात आली. त्यानंतर भोंदूबाबा १३ वर्षाच्या मुलीला एका बाजूला घेऊन गेला आणि तिथेच तिच्यावर बलात्कार केला.
मुलीला भोंदूबाबाने दिली धमकी
अत्याचार केल्यानंतर याबद्दल कुणाला सांगू नको, नाहीतर जीवे मारेन, अशी धमकी या भोंदूबाबाने मुलीला दिली होती. पण, मुलीने झालेल्या प्रकाराची घरच्यांना माहिती दिली. त्यामुळे कुटुंब हादरले आणि त्यांनी कासा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून भोंदूबाबाला ५ मे रोजी पहाटे ४ वाजता अटक केली. शिवराम परश सावर असे या भोंदूबाबाचे नाव आहे.