West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 18:24 IST2026-05-06T18:22:52+5:302026-05-06T18:24:46+5:30
West Bengal Violence : डीजीपींनी दिलेल्या माहितीनुसार, २०० हून अधिक एफआयआर (FIR) नोंदवण्यात आले असून ४०० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.

West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर वातावरण तणावपूर्ण झालं आहे. भाजपाचा मोठा विजय आणि तृणमूल काँग्रेस १५ वर्षांनंतर सत्तेतून बाहेर पडल्यानंतर राज्याच्या अनेक भागांतून हिंसाचार, तोडफोड आणि संघर्षाच्या बातम्या समोर आल्या. या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला आहे. राज्याच्या डीजीपींनी दिलेल्या माहितीनुसार, २०० हून अधिक एफआयआर (FIR) नोंदवण्यात आले असून ४०० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.
राज्याचे पोलीस महासंचालक (डीजीपी) सिद्ध नाथ गुप्ता यांनी सांगितलं की, निवडणुकीनंतर उसळलेल्या हिंसाचाराप्रकरणी कडक कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी माहिती दिली की, आतापर्यंत २०० हून अधिक गुन्हे दाखल झाले असून ४३३ लोकांना विविध प्रकरणांत अटक करण्यात आली आहे. याशिवाय वेगवेगळ्या कलमान्वये ११०० हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या कारवाईनंतर आज सकाळपासून कोणतीही नवीन अनुचित घटना घडलेली नाही आणि परिस्थिती आता शांत आहे.
DG Siddhinath Gupta
— Kamalika Sengupta (@KamalikaSengupt) May 6, 2026
A total of 433 arrests have been made in connection with post-poll violence.
People may have grievances, but they should approach the police station, maintain calm, and report their concerns to the police, said the West Bengal Director General of Police.… pic.twitter.com/yYWyUQH4TW
भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू
मुख्य निवडणूक आयुक्तांचे कारवाईचे निर्देश
निवडणुकीनंतरच्या हिंसाचारात दोन जणांचा मृत्यू आणि अनेक पक्षांच्या कार्यालयांची तोडफोड झाल्याच्या बातम्यांमुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली होती. त्यानंतर निवडणूक आयोगानेही कठोर भूमिका घेतली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राज्य अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की, हिंसाचार आणि तोडफोडीत सामील असलेल्या आरोपींवर तातडीने कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या उद्देशाने आयोगाने हे निर्देश दिले आहेत.
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
पश्चिम बंगालच्या विविध भागांत हिंसाचार
पश्चिम बंगालमध्ये निकाल जाहीर झाल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी हिंसाचार उसळला होता. मंगळवारी संध्याकाळी न्यू टाऊन भागात विजय मिरवणुकीदरम्यान तृणमूल काँग्रेसच्या (TMC) कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीत भाजप कार्यकर्ता मधू मंडल यांचा मृत्यू झाला. बिरभूममधील नानूर येथे भाजपा कार्यकर्त्यांनी टीएमसी कार्यकर्ता अबीर शेख यांची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचा आरोप आहे. यासोबतच कोलकाता येथील टॉलीगंज आणि कसबा व्यतिरिक्त बारुईपूर, कमरहाटी, बरानगर या उपनगरांमध्ये तसेच हावडा आणि बहरामपूर येथील टीएमसी कार्यालयांमध्ये आगजनी आणि तोडफोडीच्या घटना समोर आल्या आहेत.