आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 18:31 IST2026-05-06T18:18:35+5:302026-05-06T18:31:33+5:30

पाकिस्तानात औषधांचा भीषण तुटवडा निर्माण झाला आहे. मध्य आशियातील युद्ध आणि वाढत्या इंधन दरामुळे औषधांच्या किमती गगनाला भिडल्या असून आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे.

Who will Pakistan reach out to now? First oil and flour became expensive, now 'these' essentials are not available! | आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 

आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 

आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला आणि आर्थिकदृष्ट्या कोसळलेला पाकिस्तान आता एका महाभयंकर संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे. पिठ, डाळ, तांदूळ आणि तेलाच्या महागाईने होरपळलेल्या जनतेला आता आजारपणात साधी औषधंही मिळेनाशी झाली आहेत. मध्य आशियातील युद्धजन्य परिस्थिती आणि अमेरिका-इराणमधील तणावाचा थेट फटका पाकिस्तानच्या आरोग्य व्यवस्थेला बसला असून, देशात औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.

युद्धाची झळ आणि पुरवठा साखळी विस्कळीत

मध्य आशियातील युद्धामुळे होर्मुज सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. याचा परिणाम म्हणजे जागतिक पुरवठा साखळी कोलमडली असून औषध निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल पाकिस्तानात पोहोचत नाहीये. शिपिंग कॉस्टमध्ये प्रचंड वाढ झाल्याने औषध कंपन्यांनी उत्पादन कमी केले आहे. परिणामी, लाहोर, कराची आणि पेशावर सारख्या मोठ्या शहरांमधील सरकारी रुग्णालयांमध्ये आता रुग्णांना उपचारांविना परत पाठवले जात आहे.

औषधांच्या किमतीत ५० टक्क्यांहून अधिक वाढ

पाकिस्तानमध्ये औषधांच्या किमतींनी सर्व सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. २०२४ मध्ये औषधांच्या किमती ५० टक्क्यांनी वाढल्या होत्या, त्यानंतर २०२५ मध्ये पुन्हा ३०-४० टक्क्यांनी वाढ झाली. आता २०२६ मध्ये आलेल्या नव्या संकटामुळे या किमतींनी उच्चांक गाठला आहे. विशेष म्हणजे, बीपी आणि कोलेस्ट्रॉलची औषधे दोन वर्षांपूर्वीच्या तुलनेत दुप्पट महागली आहेत.

सरकारचा निर्णय आणि लोकांचे हाल

शहबाज शरीफ सरकारने औषध निर्मितीच्या कच्च्या मालावर १८ टक्के सेल्स टॅक्स लावून जखमेवर मीठ चोळले आहे. कराचीतील घाऊक विक्रेत्यांच्या मते, दर १५ ते २० दिवसांनी औषधांच्या किमती बदलत आहेत. 'पाकिस्तान केमिस्ट अँड ड्रग असोसिएशन'च्या म्हणण्यानुसार, सरकार किमतींबाबत निर्णय घेण्यास उशीर करत असल्यामुळे आयातक औषधांचा पुरवठा रोखून धरत आहेत, ज्यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण होत आहे.

तेलाच्या खेळात पाकिस्तान 'क्लीन बोल्ड'

अमेरिका-इराण तणावामुळे इंधनाचे दर प्रचंड वाढले आहेत. पाकिस्तान आपल्या ऊर्जेसाठी ८५ ते ९० टक्के आखाती देशांवर अवलंबून आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत १० टक्के वाढ झाली की पाकिस्तानात महागाई थेट ०.६ टक्क्यांनी वाढते. इंधनाचे बिल दर आठवड्याला ३०० दशलक्ष डॉलरवरून थेट ८०० दशलक्ष डॉलरवर गेले आहे. यामुळे परकीय चलन साठा संपत असून रुपयाची घसरण थांबायचं नाव घेत नाहीये. एकूणच, पाकिस्तान सध्या एका अशा दुष्टचक्रात अडकला आहे जिथे पोट भरण्यासाठी अन्न नाही आणि जीव वाचवण्यासाठी औषध नाही. सरकार आणि युद्धजन्य परिस्थितीच्या कात्रीत आता पाकिस्तानचा सामान्य नागरिक भरडला जात आहे.

Web Title : पाकिस्तान का संकट गहराया: भोजन नहीं, महंगी दवा, आर्थिक पतन का खतरा।

Web Summary : पाकिस्तान गंभीर आर्थिक संकट का सामना कर रहा है, भोजन और दवाओं की कीमतें आसमान छू रही हैं। युद्ध से बाधित आपूर्ति श्रृंखला कमी को बढ़ाती है। भू-राजनीतिक तनाव के कारण ईंधन की बढ़ती लागत स्थिति को और खराब करती है, जिससे नागरिक कगार पर पहुंच जाते हैं।

Web Title : Pakistan's Crisis Deepens: No Food, Expensive Medicine, Economic Collapse Looms.

Web Summary : Pakistan faces severe economic crisis, with soaring food and medicine prices. War-disrupted supply chains exacerbate shortages. Rising fuel costs due to geopolitical tensions worsen the situation, pushing citizens to the brink.