५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 16:09 IST2026-05-06T16:09:06+5:302026-05-06T16:09:39+5:30

भारतीय निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, येथील एकूण ८२४ जागांपैकी १०७ जागांवर मुस्लीम उमेदवारांनी विजय मिळवला आहे. मात्र भाजपच्या खात्यात एकही मुस्लीम आमदार नाही.

How many Muslim candidates won elections in 5 states Most in Bengal None from BJP | ५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!

५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!

पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि केरळ या चार राज्यांत तसेच पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांनी देशातील राजकारणाचे चित्रच बदलले आहे. या निवडणुकीत भाजपने पश्चिम बंगालमध्ये मोठा विजय मिळवला आणि ममता बॅनर्जी यांच्या तृणमूलचा सत्तेवरून बाजूला केले. याशिवाय आसाममध्येही भाजपने जोरदार पुनरागमन करत सत्ता कायम ठेवली. 

याच बरोबर केरळमध्ये तब्बल एका दशकानंतर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 'यूडीएफ'ने सत्ता मिळवली. चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात पार पडलेल्या या निवडणुकीत मुस्लीम उमेदवारांच्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भारतीय निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, येथील एकूण ८२४ जागांपैकी १०७ जागांवर मुस्लीम उमेदवारांनी विजय मिळवला आहे. मात्र भाजपच्या खात्यात एकही मुस्लीम आमदार नाही.

पश्चिम बंगाल - २९४ सदस्यसंख्या असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभेत सर्वाधिक ४० मुस्लीम उमेदवार विजयी झाले आहेत. २०२१ चा विचार करता,  ही संख्या ४ ने घटली आहे. महत्वाचे म्हणजे, टीएमसीच्या आमदारांची संख्या ४३ वरून ३४ वर आली आहे, तर बिगर टीएमसी-भाजप मुस्लीम आमदारांची संख्या ६ झाली आहे.

केरळ - येथील १४० जागांपैकी ३५ मुस्लीम उमेदवार विजयी झाले आहेत. हे प्रमाण एकूण आमदारांच्या २५ टक्के एवढे आहे. यात यूडीएफच्या ३० उमेदवारांचा समावेश आहे, तर माकपाचे ४ आणि भाकपाचा १ उमेदवार विजयी झाला आहे.

आसाम - येथे १२६ जागांच्या विधानसभेत २२ मुस्लीम उमेदवार विजयी झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे काँग्रेसच्या एकूण १९ आमदारांपैकी १८ मुस्लीम आहेत. या निवडणुकीचा विचार करता, मतदारसंघांची पुनर्रचना आणि बदललेली समीकरणे यामुळे येथील जागा घटल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

तामिळनाडू - येथे अभिनेता विजय यांच्या टीव्हीके (TVK) पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. येथील २३४ सदस्यांच्या विधानसभेत केवळ ९ मुस्लीम उमेदवार विजयी झाले आहेत. यात डीएमके, आययूएमएल आणि अभिनेता विजयच्या टीव्हीके (TVK) पक्षाचे प्रत्येकी ३ उमेदवारांचा समावेश आहे.

पुद्दुचेरी - ३० जागांच्या या केंद्रशासित प्रदेशात मुस्लीम समाजाचा केवळ १ च उमेदवार निवडून आला आहे. डीएमकेचे ए.एम.एच. नजीम असे या उमेदवाराचे नाव आहे.

टक्केवारीचा विचार करता, एकूण १०७ मुस्लिम आमदारांची ही संख्या एकूण जागांच्या १४.४० टक्के एवढी आहे.

 

Web Title : 5 राज्यों में मुस्लिम उम्मीदवार जीते; भाजपा का खाता खुला नहीं!

Web Summary : पांच राज्यों में 107 मुस्लिम उम्मीदवार जीते, पश्चिम बंगाल में सर्वाधिक 40। असम में कांग्रेस के 19 विधायकों में से 18 मुस्लिम थे। भाजपा को एक भी मुस्लिम विधायक सीट नहीं मिली। कुल मिलाकर, मुस्लिम विधायक कुल सीटों का 14.40% प्रतिनिधित्व करते हैं।

Web Title : Muslim Candidates Win in Five States; BJP Has None!

Web Summary : Across five states, 107 Muslim candidates won, with West Bengal leading at 40. Congress had 18 Muslim MLAs out of 19 in Assam. BJP failed to secure any Muslim MLA seats. Overall, Muslim MLAs represent 14.40% of total seats.