IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?

IPL 2026 Final Venue shifted: बीसीसीआयने आज बंगळुरूवरील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हलवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 14:42 IST2026-05-06T14:39:14+5:302026-05-06T14:42:54+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 Why was the venue of the final in Bengaluru rcb chinnaswami stadium changed What happened suddenly | IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?

IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?

IPL 2026 Final Venue shifted: यंदाचा अंतिम सामना बंगळूरूमध्ये होणार होता. गतविजेत्या आरसीबीचे हे घरचे मैदान आहे. प्रत्येक वर्षीचा अंतिम सामना हा गतविजेत्या संघाच्या घरच्या मैदानावर होत असतो. BCCI नेही यापूर्वी अंतिम सामना बंगळूरमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. पण आज अचानक अंतिम सामना बंगळूरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवरून हलवण्यात आला आहे. आयपीएलच्या १९व्या हंगामाचा अंतिम सामना आता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. अंतिम सामना बंगळुरूहून अहमदाबादला का हलवण्यात आला? अचानक जागा बदलण्याच्या या निर्णयामागे काय कारण? याची माहिती आता समोर आली आहे.

IPL 2026 च्या अंतिम सामन्याचे ठिकाण का बदलण्यात आले?

यंदाच्या अंतिम सामन्याचे ठिकाण बदलण्यामागे तेथे निर्माण झालेला आमदारांचा वाद हे कारण असल्याचे मानले जात आहे. जर हा वाद वेळेत मिटला नाही, तर बीसीसीआय आपली दुसरी योजना राबवू शकते, असे संकेत आधीच मिळाले होते आणि नेमके तेच घडले. आमदारांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे बीसीसीआयने अंतिम सामन्याचे ठिकाण तेथून हलवण्याचा निर्णय घेतला.


आमदारांच्या वादाचे प्रकरण काय?

RCB आणि SRH यांच्यातील IPL 2026 च्या सलामीच्या सामन्यापूर्वी, काँग्रेस आमदार विजयानंद कशप्पनवर यांनी सुचवले की प्रत्येक आमदाराला सामन्यांसाठी किमान पाच तिकिटे मिळाली पाहिजेत. आमदार हे लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यांना रांगेत थांबण्यास भाग पाडले जाऊ नये, असे ते म्हणाले. या वक्तव्यानंतर, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी सुचवले की प्रत्येक आमदार आणि खासदाराला आरसीबीच्या सामन्यांसाठी पाचऐवजी तीन तिकिटे तरी मिळाली पाहिजेत. उपमुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर प्रकरण अधिकच चिघळले. तिकिटांच्या गैरवापराचे आरोप झाले. कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी स्पष्टपणे नाकारले.

प्रकरण अद्यापही चर्चेत, अखेर BCCI ने बदलला निर्णय

या समस्यांचे निराकरण न झाल्याने, बीसीसीआयने बंगळूरुमध्ये अंतिम सामना आयोजित करण्याचा आपला निर्णय मागे घेतला. बीसीसीआयच्या मते, स्थानिक संघटना आणि अधिकाऱ्यांच्या काही मागण्या त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमांच्या विरोधात होत्या. त्यामुळे, अंतिम सामना दुसऱ्या ठिकाणी आयोजित करणे हाच एकमेव पर्याय होता.

Web Title : IPL 2026 फाइनल वेन्यू बदला: बेंगलुरु ने मेजबानी क्यों खोई?

Web Summary : विधायक टिकट मांगों के साथ अनसुलझे मुद्दों के कारण आईपीएल 2026 का फाइनल बेंगलुरु से अहमदाबाद स्थानांतरित कर दिया गया। बीसीसीआई ने स्थल बदलने का फैसला किया क्योंकि ये मांगें उनके दिशानिर्देशों के खिलाफ थीं।

Web Title : IPL 2026 Final Venue Shifted: Why Bengaluru Lost Hosting Rights?

Web Summary : The IPL 2026 final was moved from Bengaluru to Ahmedabad due to unresolved issues with legislator ticket demands. The BCCI decided to shift the venue as these demands conflicted with their guidelines.