IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी

पंजाब किंग्सविरुद्ध सनरायझर्स हैदराबादनं प्रस्थापित केला नवा विक्रम

By सुशांत जाधव | Updated: May 6, 2026 22:16 IST2026-05-06T22:07:18+5:302026-05-06T22:16:49+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 SRH vs PBKS Ishan Kishan Heinrich Klaasen brilliant show Sunrisers Hyderabad equals Mumbai Indians Record | IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी

IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी

हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडियमवर रंगलेल्या पजांब किंग्सविरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्मा आणि ट्रॅविस हेड या सलामीवीरांनी सनरायझर्स हैदराबादच्या संघाला धमाकेदार सुरुवात करून दिली. हेन्री क्लासेन आणि ईशान किशनचा शानदार शोसह अखेरच्या षटकात नितीश कुमार रेड्डीने मोठा धमाका केला. या पाच जणांच्या खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादच्या संघाने निर्धारित २० षटकात ४ बाद २३५ धावा केल्या. हैदराबादच्या संघाने IPL इतिहासातील पंजाब किंग्स विरुद्धची दुसरी सर्वोच्च धावसंख्या उभारताना मुंबई इंडियन्सच्या खास विक्रमाशी बरोबरी करण्याचा डाव साधला.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

 MI नंतर अशी कामगिरी करणारा SRH ठरला दुसरा संघ

आयपीएलच्या इतिहासात एका संघाविरुद्ध सर्वाधिक  ८ वेळा २०० पेक्षा अधिक धावा करण्याचा रेकॉर्ड या आधी मुंबई इंडियन्सच्या नावे होता. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध त्यांनी ही कामगिरी नोंदवली होती. आता सनरायझर्स हैदराबादच्या संघाने पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात आठव्यांदा २०० पेक्षा अधिक धावसंख्या उभारत त्यांची बरोबरी केली आहे. 

SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)

अभिषेक-ट्रॅविस हेडचा धमाका
 
श्रेयस अय्यरने या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अभिषेक शर्मा ३५ (१३) आणि ट्रॅविस हेड ३८ (१९) यांनी तुफान फटकेबाजी करत त्याचा निर्णय व्यर्थ ठरवला. या दोघांनी २० चेंडूतच संघाच्या धावफलकावर ५० धावा लावल्या. सनरायझर्स हैदराबादची आयपीएलच्या इतिहासातील ही तिसरे  जलद अर्धशतक ठरले. 

मग क्लासेन आणि ईशानचा शानदार शो अन्...

सलामी जोडी आपले काम करून परतल्यावर हेन्री क्लासेन आणि ईशान किशन जोडी जमली. तिसऱ्या विकेटसाठी ४८ चेंडूत ८८ धावांची भागीदारी रचली. ईशान किशन याने ३२ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने ५५ धावांची खेळी केली. क्लासेन याने ४३ चेंडूचा सामना करताना ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६९ धावांची खेळी केली. अखेरच्या षटकात नितिश कुमार रेड्डीनं १३ चेंडूत २९ धावा कुटल्या.

Web Title : आईपीएल रिकॉर्ड: क्लासेन, ईशान चमके; सनराइजर्स ने मुंबई इंडियंस की बराबरी की

Web Summary : क्लासेन और ईशान के शानदार प्रदर्शन से सनराइजर्स हैदराबाद ने पंजाब किंग्स के खिलाफ विशाल स्कोर खड़ा किया। उन्होंने आईपीएल इतिहास में मुंबई इंडियंस के एक टीम के खिलाफ सबसे ज्यादा 200+ रन बनाने के रिकॉर्ड की बराबरी की।

Web Title : IPL Record: Klassen, Kishan shine; Sunrisers equal Mumbai Indians

Web Summary : Sunrisers Hyderabad's explosive start, powered by Klassen and Kishan, led them to a massive score against Punjab Kings. They equaled Mumbai Indians' record of scoring 200+ runs most times against a single opponent in IPL history.