मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 05:50 IST2026-05-06T05:49:34+5:302026-05-06T05:50:26+5:30
तो हाँगकाँग आणि मीरा रोड या दोन्ही ठिकाणी ये-जा करीत असल्याने यातील तथ्य वनराई पोलिस पडताळून पाहात आहेत.

मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
गौरी टेंबकर-कलगुटकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नेस्को ड्रग्सप्रकरणी अटक करण्यात आलेला बारावा आरोपी मार्क ऊर्फ महेश खेमलानी (वय ४४) याच्या घरी एक व्यक्ती कुरिअरने ड्रग्ज पुरवठा करत असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली आहे.
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
तो हाँगकाँग आणि मीरा रोड या दोन्ही ठिकाणी ये-जा करीत असल्याने यातील तथ्य वनराई पोलिस पडताळून पाहात आहेत. एक्स्टसी (एमडीएमए) या नशेच्या गोळ्यांचा व्यापार क्रिप्टो करन्सीमध्येही झाल्याचा संशय तपास अधिकाऱ्यांना असून त्या अनुषंगाने चौकशी सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
ड्रग्ज कुरिअरने पाठविले
वनराई पोलिसांच्या चौकशीत ‘’माझ्या घरी ड्रग्जचे पार्सल कुरिअरने यायचे’’ असे त्याने सांगितले आहे. तो हाँगकाँग आणि मीरा भाईंदरच्या लोढा कासा मॅक्झीमा सोसायटीत जिया रिचेल जेकब सोबत राहत होता. त्यामुळे त्याला हे ड्रग्ज विकणारा कोण आहे, याचा तपास करीत ड्रग्ज फॅक्टरीशी त्याचा संबंध पोलिस पडताळून पाहात आहेत. कॉन्सर्टमध्ये ज्या ड्रग्जच्या गोळ्यांची विक्री करण्यात आली, त्याचे ऑनलाईन ट्रांजेक्शन पोलिसांना सापडले आहे. मात्र, रोख रकमेच्या स्वरूपातही या गोळ्यांची विक्री झाल्याबाबत पडताळणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना व्यवहार क्रिप्टो करन्सीमध्ये झाल्याचा संशय आहे.
९३८ एक्स्टसीच्या गोळ्या लागल्या हाती
दरम्यान, अद्याप आमच्या हाती ९३८ एक्स्टसीच्या गोळ्या लागल्या असून आरोपींमध्ये जवळपास ६० लाखांचा व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. या गुन्ह्यामध्ये एकमेकांची नावे घेत असल्याने त्यांना समोरासमोर बसवून सत्य वदवून घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.
सात महिन्यांपूर्वी आयुषची ‘हाँगकाँग’ वारी!
आयुष हा या प्रकरणातील मुख्य आरोपी सात महिन्यांपूर्वी हाँगकाँगला गेला असताना त्याची मार्कशी भेट झाल्याचे तपासात दिसून आले आहे. त्याच्या पासपोर्टची पडताळणी करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने नमूद केले.