मोदी व भाजपा सरकारच्या निषेधार्थ भाईंदरमध्ये काँग्रेसचे आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2020 09:00 PM2020-10-02T21:00:30+5:302020-10-02T21:08:04+5:30

Mira Bhayandar News : सत्ताधारी भाजप विरोधी घोषणाबाजी करत शेतकरी कायद्याचा निषेध केला.

Congress agitation in Bhayander to protest Modi and BJP government | मोदी व भाजपा सरकारच्या निषेधार्थ भाईंदरमध्ये काँग्रेसचे आंदोलन 

मोदी व भाजपा सरकारच्या निषेधार्थ भाईंदरमध्ये काँग्रेसचे आंदोलन 

Next

मीरारोड - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रातल्या भाजपा सरकारने पाशवी बहुमताच्या बळावर केलेले कायदे हे शेतकरी आणि कामगारांना उद्ध्वस्त करणारे असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या वतीने आज भाईंदर पूर्व येथे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. 

महात्मा गांधी आणि भारतरत्न लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष, मुझफ्फर हुसेन यांच्या मार्गदर्शना खाली आजचे आंदोलन केले गेले असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी सांगितले. बाळाराम पाटील मार्गावरील काँग्रेस कार्यालयपासून काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध फेरी काढली. नवघर नाक्यावर त्यांनी धरणे धरले. सत्ताधारी भाजप विरोधी घोषणाबाजी करत शेतकरी कायद्याचा निषेध केला. उत्तर प्रदेशच्या हाथरस प्रकरणात मरण पावलेल्या पीडित तरुणीला श्रद्धांजली वाहून आंदोलन समाप्त करण्यात आले.

 

Web Title: Congress agitation in Bhayander to protest Modi and BJP government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app